Next
‘कुंकू टिकली आणि टॅटू’ ’कलर्स मराठी’वर
प्रेस रिलीज
Friday, March 30, 2018 | 02:49 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महिलेच्या परस्परविरोधी विचारसरणीतील द्वंद्व या कथासूत्रावर आधारित आणि युफोरिया प्रॉडक्शन्स निर्मित ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ दोन एप्रिलपासून कलर्स मराठीवर सुरू होत आहे. या मालिकेमध्ये गुरुराज अवधानी हा विष्णुपंत कुलकर्णी ही भूमिका साकारणार असून, सारिका निलाटकर–नवाथे ही विभा कुलकर्णी ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. यांच्यासोबत नवोदित भाग्यश्री न्हालवे, आदिश वैद्य, श्वेता पेंडसे, अमोल बावडेकर, राजेश देशपांडे, राजश्री निकम, प्रमुख भूमिकेत असणार आहेत. ‘’

ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता प्रसारित होईल. काळ कितीही बदलला, तरीही घर सांभाळणे, मुलांचे संगोपन, त्यांच्यावर संस्कार, नवरा, सासरची माणसे या सगळ्यांना सांभाळणे, घराला घरपण देणे अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळते ती स्त्री! तरीही मर्यादांची बंधने ही स्त्रियांनाच घातली जातात. परंतु आता चित्र बदलत आहे स्त्रीला आपली स्वत:ची मतं आहेत, विचार आहेत आणि जेव्हा आजच्या काळातील मुलगी आपले विचार मांडते तेंव्हा तिला बंडखोर म्हटले जाते. अशाच परस्परविरोधी विचारसरणीतील द्वंद्व या कथासूत्रावर आधारित ही मालिका आहे.

विभा कुलकर्णी हे पुण्यातले मोठे प्रस्थ आहे, बाईन बाई सारखे वागावे, आपल्या मर्यादेत राहावे, अशी त्यांची भूमिका आहे. घरातील सुनाही विभाच्या शब्दाबाहेर नाहीत. त्यांनी आखून दिलेल्या चौकटीतच जगत आहेत. हे घर अत्यंत पारंपरिक, पण प्रसंगी कर्मठ आहे. वडील, भाऊ, नवऱ्यांना समाधानात आणि सुखात ठेवण्याची जबाबदारी घरच्या स्त्रीवर आहे अशा विचारांवर उभे आहे. अशा घरामध्ये रमासारखी बिनधास्त, आताच्या युगातली कार्यक्षम, स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी सून म्हणून येते.

रमाला बास्केटबॉल खेळायला आवडतो. विभक्त कुटुंबातून आल्यामुळे रमाच्या मनामध्ये समस्त पुरुष जातीबद्दल आणि कुटुंब व्यवस्थेबद्दल नाराजी आहे. तिची स्त्री स्वातंत्र्याबद्दल ठाम मत आहेत आणि जेव्हा विभा आणि रमा या परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या स्त्रिया एकमेकांसमोर येतील तेव्हा घराचे घरपण, कौटुंबिक जिव्हाळा, एकमेकांबद्दलचे प्रेम या दोघी कशा टिकवून ठेवतील, रमा आणि विभा कसा समतोल साधतील, कुलकर्णी परिवार आणि विभा रमाला स्वीकारू शकतील का, रमाची आधुनिक विचारसरणी आणि कुलकर्ण्यांचा परंपरावाद यांचा मेळ बसेल का, हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे.

या मालिकेच्या निमित्ताने ‘कलर्स मराठी’प्रमुख, ‘व्हायाकॉम-१८’चे निखील साने म्हणाले, ‘कुंकू टिकली आणि टॅटू’या मालिकेमध्ये एकीकडे परंपरा आणि कर्मठ विचारसरणी, तर दुसरीकडे आधुनिकतेचा ध्यास घेतलेली आजच्या मुलांची विचारसरणी यांची उत्तमरीत्या सांगड घातली आहे. जिव्हाळ्याचा विषय आणि त्याची नेहेमीपेक्षा वेगळी मांडणी असल्याने आम्हाला खात्री आहे ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’

‘कलर्स’चे क्रिएटीव डिरेक्टर आणि मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान म्हणाले, ‘सासू-सुनेचे नाते चॉकलेटच्या जाहिराती सारखे नाचायला लावणारे नसले, तरी प्रेमाच्या उबदार बंधनात जखडले गेले, तर समस्त नवरे मंडळी, देवाच्या आणि दैवाच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाहीत. जगातल्या सर्व नवरे आणि पुरुष मंडळींसाठी ही मालिका समर्पित. प्रत्येक स्त्रीला पटणारी आणि प्रत्येक पुरुषाने आपल्या घरातल्या सगळ्या स्त्रियांची नोंद घ्यायला लावणारी ही मालिका आम्ही घेऊन येत आहोत.’

आपल्या भुमिकेबद्दल बोलताना सारिका निलाटकर-नवाथे म्हणाल्या, ‘कुंकू, टिकली आणि टॅटू’ही मालिका थोडी वेगळ्या ढंगाची आहे आणि माझी या मालिकेतील भूमिका थोडी वेगळीच आहे. मालिकेमध्ये मी विभा कुलकर्णी या नावाची भूमिका साकारणार आहे. विभा परंपरेला धरून चालणारी स्त्री आहे. या पात्राची काही तत्त्व, मूल्य आहेत जी आजच्या मुलांना बंधंन वाटू शकतात. तिच्या या तत्त्वांना तिचे स्पष्टीकरण आहे आणि त्यामुळे तिच्या बोलण्याचा हेतू लगेचच स्पष्ट होतो. घरामध्ये आलेली सून आणि विभा यांच्या विचारसरणीमध्ये खूप फरक आहे तेव्हा या कशा एकमेकींना समजून घेतील हे प्रेक्षकांनी बघण्यासारखे असणार आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link