Next
ठाणे, मीरा-भाईंदर उपनगरे मेट्रोने मुंबईला जोडणार
BOI
Wednesday, July 24, 2019 | 11:42 AM
15 0 0
Share this article:

ठाणे : नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई मेट्रो मार्ग-१०च्या ठाणे गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड या मार्गावर मेट्रो प्रकल्प अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली आहे. यामुळे भविष्यात ठाणे, मीरा-भाईंदर व मुंबई शहरातील मेट्रो एकमेकांना जोडल्या जाणार असून, मेट्रोचे जाळे विणले जाणार आहे. ठाणे, मीरा-भाईंदर व मुंबई ही महानगरे मेट्रो मार्गाने जोडली जावीत म्हणून सातत्याने पाठपुरावा व संघर्ष करणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यामुळे यश आले आहे. 

ठाण्यात मेट्रोचे काम सुरू झाले आहे, तर दहिसर ते मीरा भाईंदर या मार्गावर मेट्रोचे काम १५ ऑगस्टच्या आसपास सुरू होणार आहे. मीरा-भाईंदर शहरात येणाऱ्या मेट्रोसाठीही आमदार सरनाईक यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न व पाठपुरावा करून ते काम मार्गी लावले. 

आमदार प्रताप सरनाईकआमदार सरनाईक ठाणे व मीरा-भाईंदर या दोन्ही शहराचे प्रतिनिधित्व विधानसभेत करतात. त्यामुळे गायमुख ते मीरा रोड या भागातही मेट्रो मार्ग मंजूर केल्यास ठाणे-मीरा-भाईंदर-मुंबई हा मार्ग जोडण्याची मागणी सर्वप्रथम मागणी आमदार सरनाईक यांनी केली होती; मात्र गायमुख व पुढील भागात मोठ्या प्रमाणात वन खात्याची जमीन असल्याने येथे मेट्रो प्रकल्प करता येणार नाही, अशी भूमिका सरकारी अधिकारी घेत होते. त्यावर मात करण्यासाठी ज्या ठिकाणी वन खात्याच्या मालकीची जमीन असेल तेथे भूमिगत मेट्रो करावी; पण ठाणे-भाईंदर मेट्रोने जोडून रिंग मेट्रो जाळे तयार व्हावे, असा आग्रह आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला होता. तेव्हापासून या प्रकल्पाला मान्यता मिळणार याची खात्री सरनाईक यांना होती. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला. 

मुंबई मेट्रो मार्ग-१०च्या ठाणे गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड या मार्गावर मेट्रो अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली असल्याने सरनाईक यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचे आभार मानले आहेत.

या विषयी आमदार प्रताप सरनाईक म्हणाले, ‘मीरा भाईंदर मेट्रोचे काम १५ ऑगस्टच्या आसपास नक्की सुरू होईल, तसे आश्वासन आपण मुख्यमंत्र्यांकडून पावसाळी अधिवेशनात घेतले होते. एकीकडे मीरा-भाईंदर मेट्रो मार्गी लागत असताना आता ठाणे व मीरा-भाईंदर आणि मुंबई यांना जोडण्यासाठी सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्याबद्दल मला समाधान आहे. ज्यावेळेस हे मेट्रो प्रकल्प पूर्ण होतील तेव्हा ठाणे, मीरा-भाईंदर व मुंबई ही तीन शहरे जोडली जातील, मेट्रोचे एक जाळे तयार होईल, सर्व मेट्रो मार्ग एकमेकांना जोडले जाणार आहेत.’  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search