Next
रोपळे गावातील शाळेत नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत
BOI
Friday, June 15, 2018 | 05:40 PM
15 0 0
Share this article:सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात आज (१५ जून २०१८) जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. रोपळे बुद्रुक (ता. पंढरपूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही नव्या विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या उप-मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी मिठाई भरवून केलेल्या स्वागताने विद्यार्थी भारावून गेले.
या वेळी नवागत विद्यार्थ्यांची गावातून मिरवणूकही काढण्यात आली. त्या मिरवणुकीतही पाटील सहभागी झाल्या होत्या. पालक व ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांनी मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल करण्याचे आवाहनही केले. त्या म्हणाल्या, ‘इंग्रजी हे वाघिणीचे दूध समजले जात असले, तरी मराठी हे गाईचे दूध आहे आणि ते पचायला सोपे असते. त्यामुळे पालकांनी इंग्रजी शाळांच्या भपक्याला बळी न पडता आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखल केले पाहिजे.’ जिल्हा परिषदेची रोपळेतील शाळा गुणवत्तेच्या बाबतीत तालुक्यात प्रथम क्रमांकावर राहिल्याबद्दल समाधान व्यक्त करून ही शाळा आता जिल्हा नव्हे, तर महाराष्ट्रात नाव कमावण्यास सज्ज असल्याचे पाटील यांनी सांगितले.
या वेळी सरपंच दिनकर कदम, नागनाथ माळी, नारायण गायकवाड, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक विलास भोसले, बाळासाहेब भोसले, अर्जुन गायकवाड, केंद्रप्रमुख डॉ. नामदेव भोसले, मुख्याध्यापक सुनील शिंदे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सारिका भोसले, सिद्धेश्वर भोसले, विलास (ल.) भोसले, सुरेश बिस्किटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.


या वेळी नवीन हजर झालेल्या शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद लोणारकर, अरुण लोखंडे, पद्मिनी व्यवहारे, वैशाली जगताप, अजिनाथ  पवार, तानाजी ढेकळे, शशिकांत कांबळे, समाधान आयरे, वर्षाराणी गोडसे, छाया समलखांब या शिक्षकवर्गाने परिश्रम घेतले. आभार मुख्याध्यापक श्री. शिंदे यांनी मानले. 

(सोलापूर जिल्हा परिषदेच्या उप-मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Arun mali About
आमच्या शाळेची बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल Bytes of India चे खुप खुप आभार..... तुम्ही केलेल्या कौतुकाने आम्हा सर्व शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे... धन्यवाद
0
0
वृषाली पाटील , पुणे About
खेडेगावातील शाळांतील उत्साह व शाळा फारच छान आहेत . बातमी वाचून आनंद वाटला .
0
0

Select Language
Share Link
 
Search