Next
समीर बेलवलकर यांची ‘शूट्स विथ सॅम’ सुविधा
फोटोग्राफीमधील पहिली अनोखी संकल्पना
प्रेस रिलीज
Tuesday, January 22, 2019 | 06:10 PM
15 0 0
Share this article:

पुणे : उत्तम छायाचित्रकार शोधायचा असेल आणि तेदेखील वाजवी खर्चात, तर आता ते अगदी सोपे झाले आहे. जोधा अकबर, माय नेम इज खानसारख्या बॉलीवूड चित्रपटांचे छायाचित्रकार; तसेच करीना कपूर, शाहरुखखान, करण जोहर यांच्याबरोबर कामाचा अनुभव असलेले सेलेब्रिटी छायाचित्रकार समीर बेलवलकर यांनी ही अनोखी सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांच्या ‘शूट्स विथ सॅम’ या सेवेच्या आधारे उत्तम  व्यावसायिक छायाचित्रकार वाजवी खर्चात उपलब्ध होऊ शकतात. 

या बाबत अधिक माहिती देताना समीर बेलवलकर म्हणाले, ‘जे ग्राहक उत्तम छायाचित्र काढून घेण्यासाठी, एखाद्या समारंभाचे अविस्मरणीय छायाचित्रण करून घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यांची व्यावसायिक, अनुभवी, प्रशिक्षित फोटोग्राफरची गरज आम्ही पूर्ण करतो. ‘शूट्स विथ सॅम’मध्ये व्यावसायिक आणि  उच्च दर्जाच्या छायाचित्रकारांचा समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांना गुणवत्तेच्या खात्रीसह बजेट फ्रेंडली दर, गरजेनुसार पॅकेजेस, ऑनलाइन पेमेंटची सुविधा मिळते.  पुण्यात प्रथम ही सेवा दाखल केली असून, लवकरच इतर शहरांमध्ये विस्तार करण्याची आमची योजना आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search