Next
जर्मन तज्ज्ञांचे ‘डीकेटीई’मध्ये मार्गदर्शन
BOI
Thursday, July 19, 2018 | 03:38 PM
15 0 0
Share this storyइचलकरंजी : जर्मन वस्त्रोद्योगातील तब्बल ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असणारे तज्ज्ञ रॉल्फ मुलर व श्री. शेफर यांनी ‘डीकेटीई’च्या टेक्स्टाइल अँड इंजिनीअरिंग इन्स्टिट्यूटमधील टेक्स्टाइलच्या विद्यार्थ्यांना एका महिना कालावधीसाठी अद्ययावत प्रशिक्षण दिले. त्यांच्या या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांसोबत, प्राध्यापक व स्टाफ यांनाही झाला. जर्मन सरकारच्या योजनेअंतर्गत एक महिन्याच्या कालावधीत त्यांनी विविध वस्त्रोद्यागातील विषयावर विद्यार्थ्याना व्याख्यान दिले. मागील वर्षीही मुलर यांनी विद्यार्थ्यांना एक महिना प्रशिक्षण दिले होते.

या तज्ज्ञ मार्गदर्शकांनी ‘डीकेटीई’च्या विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील होत असलेले तंत्रज्ञानातील बदल, जर्मन टेक्स्टाइल इंडस्ट्रीज, तेथील सद्यस्थिती, भविष्यातील वस्त्रोद्योगाची वाटचाल व जर्मनमधील करिअर संधी आदी अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. मुलर व शेफर यांना जर्मनीतील विविध नामांकित टेक्स्टाइल ऑर्गनायझेशनमध्ये सिनिअर एक्स्पर्ट या पदावरचा अनुभव आहे.

मुलर यांना टेक्स्टाइल प्रोसेसिंग, डायिंग, फिनींशिंग टेक्नॉलॉजी, प्रिंटिंग, प्रोडक्शन, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, टेक्स्टाइल टेस्टिंग यामधील अनुभव आहे. फॅन्सी यार्न मॅन्युफॅक्चरिंग, मॅन मेड प्रोडक्शन, केमिकल टेस्टिंग आदी  टेक्स्टाइलच्या विषयावर त्यांचा हातखंडा आहे.  

शेफर यांना निटिंग विषयामधील प्रदीर्घ अनुभव आहे.  त्यांनी निटिंग, सॉक्स निटिंग व मेडिकल सॉक्स अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी अमेरिका, चायना, इटली, इथोपिया अशा विविध देशांना भेटी दिल्या आहेत. प्रशिक्षणकालावधीमध्ये त्यांनी प्रथम ते अंतिम वर्ष टेक्स्टाइल पदविका, पदवी व पदव्युत्तर शिक्षण संपादन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना लेक्चरच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.  

याविषयी बोलताना टेक्स्टाइल केमिस्ट्रीच्या अंतिम वर्षात शिकणारा कौशल शाह म्हणाला, ‘डीकेटीईमध्ये बऱ्याच जर्मनमेड मशिनरीवर आम्ही प्रात्यक्षिक करीत असतो. त्यामुळे आमच्या शंकेचे निरसन करण्यासाठी आम्ही जर्मन तज्ज्ञांशी संवाद साधला व त्यांनी आम्हाला विस्तृतपणे मार्गदर्शन केले.’
 
टेक्स्टाइल प्लॅंट इंजिनीअरिंगच्या तृतीय वर्षात शिकणारी आराधना कांबळे म्हणाली, ‘जर्मन तज्ज्ञांच्या ज्ञानाचा व मार्गदर्शनाचा उपयोग आम्हाला आमचे वस्त्रोद्योगातील ज्ञान वाढवण्यासाठी झाला आहे व त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साही वातावरण आहे. या तज्ज्ञांनी आम्हा विद्यार्थ्यांशी ‘जर्मन लँग्वेज कोर्स’ या विषयावार देखील संवाद साधला व याचा उपयोग भविष्यकाळात आम्हाला इंटरनॅशनल प्लेसमेंटसाठी होणार आहे.’  

यापूर्वीही जर्मनीतील नामांकित विद्यापीठ व अनेक इंडस्ट्रीजनी ‘डीकेटीई’शी करार केला आहे. ‘डीकेटीई’ जर्मन देशातील विविध टेक्स्टाइलच्या एक्झिशेनमध्ये सहभाग घेण्यात अग्रेसर आहे. ‘डीकेटीई’च्या १५ हून अधिक प्राध्यापकांनी जर्मन येथील इंडस्ट्रीज व इन्स्टिट्यूटना भेटी दिल्या असून, त्यांनीही जर्मनीतील विद्यापीठामध्ये लेक्चरच्या माध्यमातून परदेशातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
 
‘डीकेटीई’साठी जर्मनीत सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देत येथील अनुभव अविस्मरणीय असल्याचे या दोन्ही तज्ज्ञांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, सर्व ट्रस्टी यांनी मुलर व शेफर यांचे इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत केले. हे प्रशिक्षण राबविण्यासाठी ‘डीकेटीई’चे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यू. जे. पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. यासाठी समन्वयक म्हणून प्रा. ए. यू. अवसरे, प्रा. एम. एस. कुलकर्णी व प्रा. आर. एच. देशपांडे यांनी काम पाहिले.
‘डीकेटीई’तील विद्यार्थ्यांना अद्ययावत प्रशिक्षण देताना  जर्मनीचे वस्त्रोद्योगातील तज्ज्ञ रॉल्फ मुलर व शेफर

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link