Next
‘श्मेरसल’चे पुण्यात पहिले जागतिक आयटी सेंटर
प्रेस रिलीज
Saturday, April 28 | 11:24 AM
15 0 0
Share this story

पुणे : इलेक्ट्रॉमेकॅनिकल सेफटी आणि लिफ्ट स्विचगेअर आणि सिस्टम्सचे निर्माता दी श्मेरसल ग्रुप, जर्मनीची उपकंपनी असलेली श्मेरसल इंडिया प्रा. लि. ने पुण्यामध्ये आपल्या पहिल्या जागतिक आयटी सेंटरचे उद्घाटन केले.

या सेंटरचे उद्घाटन जर्मनीतील के. ए. श्मेरसलजी एमबीएच अँड कं. केजीचे व्यवस्थापकीय संचालक मायकल ऍम्ब्रोस यांनी केले. हे सेंटर तीन हजार ३०५ चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले असून येथे १५ कार्यात्मक आणि तांत्रिक कर्मचारी आहेत.

या वेळी ऍम्ब्रोस म्हणाले, ‘हे जर्मनीच्या बाहेर स्थापन झालेले पहिले वैश्विक सहाय्यक कार्यकलाप आहे आणि संपूर्ण श्मेरसल ग्रुपला एसएपी कार्यान्वयन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी कुशल संसाधनांसह पाठिंबा देण्यासाठी भारत हा एक सक्षम केंद्र म्हणून ओळखला गेला आहे. या उपक्रमामुळे भारतीयांसाठी रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत.’

कार्यस्थळाला सुरक्षित स्थानांमध्ये रुपांतरीत करणे या उद्देशासह श्मेरसल इंडियाने २००७मध्ये मशीन सेफ्टीसाठी वाढत्या भारतीय बाजारपेठेत भाग घेऊन एक कंपनी म्हणून सुरुवात केली. २०१२मध्ये भारतातील उत्पादन कारखान्यांचा आधारस्तंभ म्हणून महाराष्ट्राच्या पुण्याजवळील रांजणगाव येथे नवीन कारखान्याच्या बांधणीत श्मेरसल ग्रुपने एकूण आठ दशलक्ष युरोंची गुंतवणूक केली. याद्वारे जुलै २०१३ मध्ये उत्पादन सुरू केले आणि आज ८६ कर्मचार्‍यांचे मुख्यालय आहे.

आपल्या भारताच्या उपस्थितीला अधिक बळकट करण्यासाठी, कंपनी भारतीय बाजारपेठेसाठी अधिक उत्पादने विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्थानिक आर अँड डी सेंटर आणि प्रोडक्ट मॅनेजमेंट वाढविण्यासाठी कुशल मनुष्यबळ जोडण्याच्या योजना आखत आहे.    

श्मेरसल इंडिया प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक सागर भोसले म्हणाले की ‘मेक इन इंडिया या उपक्रमाला पुढे पाठिंबा देत, श्मेरसल इंडियामधील उत्पादन सुविधा वैशिष्ट्य अनुप्रयोगाच्या गरजेनुसार स्थानिक मार्केटसह सध्याच्या भारतीय कारखान्यात १०० टक्के निर्यात-उन्मुखपासून (ईओयू) श्मेरसल ग्रुपला निर्यात करण्यासाठी सानुकूल सुरक्षा उत्पादने डिझाइन करून आणि उत्पादन करून त्याच्या उत्पादन श्रेणीत वाढ करत आहे; तसेच, आम्ही मुंबईजवळ एक मुक्त व्यापार व गोदाम क्षेत्र (एफटीडब्ल्यूझेड) स्थापन केले आहे, जे विशेषतः जागतिक भारतीय कंपन्यांसाठी आहे, ज्यांना विशेष सवलत शुल्कावर माल चढवण्याची परवानगी आहे.’

२०१७च्या अखेरीस, भारतीय कारखान्यामध्ये भारतातील बाजारपेठेत एक दशलक्षहून अधिक सेफ्टी स्विचचे उत्पादन झाले आणि पुरवठा केला. विद्यमान उत्पादन क्षमता प्रति वर्ष पाच दशलक्ष सुरक्षा स्वीच असे आहे.

श्मेरसल ग्रुपबद्दल :
श्मेरसल ग्रुपची स्थापना १९४५ मध्ये झाली. श्मेरसल ग्रुपने जगभरातील एक हजार ७५० लोकांना रोजगार दिला आहे आणि या कंपनीचे तीन खंडांवर सात उत्पादन स्थळे आहेत; तसेच ६० पेक्षा अधिक देशांमध्ये स्वतःच्या कंपन्या आणि विक्री भागीदार आहेत.

२०१७मध्ये, श्मेरसल ग्रुपने सुमारे २३४ दशलक्ष युरो एवढी उलाढाल केली आहे. श्मेरसल ग्रुपच्या ग्राहकांमध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि प्लांट मॅन्युफॅक्चरिंगचे जागतिक खेळाडू तसेच मशीनरीचे ऑपरेटर यांचा समावेश आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link