Next
‘मर्सिडिझ बेंझ’च्या विक्रीत विक्रमी वाढ
प्रेस रिलीज
Monday, July 09, 2018 | 04:25 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारतातील सर्वात मोठा लक्झरी कार ब्रँड असलेल्या मर्सिडिझ बेंझने २०१८मधील जानेवारी ते जून या कालावधीत तब्बल आठ हजार ६१ युनिट्सची विक्री करून, १२.४ टक्क्यांच्या विक्रमी विकासाची नोंद केली आहे (जानेवारी ते जून २०१७- सात हजार १७१ युनिट्स). या विक्रीमुळे मर्सिडिझ बेंझने भारतात वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम वाढीचा टप्पा गाठला आहे.

मर्सिडिझ बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि सीईओ रोलंड फोल्जर म्हणाले, ‘आमच्या ‘द बेस्ट कीप्स लीडिंग’ (सर्वोत्तम नेहमीच अग्रणी असते) या तत्त्वज्ञानामुळे २०१८ मधील पहिल्या सहामाहीत, लक्झरी कार प्रकारात १२.४ टक्क्यांची वाढ झाली असून, सर्वात जास्त ग्राहक पसंती असलेला ब्रँड कायम राहिला आहे. आमची आगळीवेगळी उत्पादने आणि ग्राहकांसाठीची सेवा अशा दोहोंसह आम्ही ग्राहकप्रधानसेवा दिल्यानेच, ही विकासगती कायम राहिल्याचे आम्ही मानतो. गेल्यावर्षी ओटूमध्ये सर्वांत जास्त मागणी होती, या अपेक्षांच्या धर्तीवरच आम्ही आमची कामगिरी केली, यात जीएसटीची अंमलबजावणी केली जाईल, याकडेही लक्ष दिले. आमच्या नव्या दमाच्या कार, सेदान, एसयूव्ही आणि परफॉर्मन्स कार यांच्यासह आम्ही अग्रणी राहू याची आम्हाला खात्री होती आणि आम्ही पहिल्या सहामाहीत स्वतःला त्यासाठी तयार केले होते.’

फोल्जर पुढे म्हणाले की, ‘भारतीय लक्झरी कार बाजारपेठेत आमचे अग्रणी स्थान आम्हाला कायम राखायचे आहे, आम्ही गेल्या तीन वर्षांपासून क्रमांक एकवर आहोत. मर्सिडिझ बेंझशी संलग्नित असलेल्या विजेत्या ब्रँडच्या चित्राचा भारतातील ग्राहकांना भाग व्हायचे आहे.’

जानेवारी ते जून २०१८ या कालावधीतील भरीव वाढ नव्या दमाच्या कार, सेदान, एसयूव्ही आणि एएमजी परफॉर्मन्स कार अशा विस्तारीत आणि तरुणाईसाठीच्या उत्पादनांच्या श्रेणीमुळे झाली आहे. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ग्राहकांनी इ-क्लास लाँग व्हीलबेस सेदानलाच आपली पसंती दिली. एस-क्लासच्या सादरीकरणात मर्सिडिझ बेंझने वाढत्या मागणीनुसार लक्झरी बिझनेस सेदानसारखे महत्त्वपूर्ण उत्पादन सादर केले. याचबरोबर, सी-क्लासमधील उत्पादनांना ग्राहकांची पसंती कायम राहिली आहे.

नव्या पिढीच्या कार संपूर्ण बाजारपेठेत चांगलीच चलती आहे आणि यात नव्या तरुण ग्राहकांमुळे आमच्या ब्रँडच्या ग्राहकाधारांत वाढ होत आहे. उच्चतम परफॉर्मन्स एएमजी मॉडेल्सना परफॉर्मन्स प्रकारांत त्यांची विकास गती कायम राखता येईल, अशी अपेक्षा आहे आणि त्यांनी या वर्षीच्या तिमाहीमध्ये स्थिर विकास केला आहे.

जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत मर्सिडिझ बेंझच्या सेदान प्रकारात सीएलए, ई-क्लास, एस-क्लास आणि मर्सिडिझ मेबॅक एस-क्लासमध्ये १५.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. लक्झरी एसयूव्ही प्रकारात जीएलएल, जीएलसी, मर्सिडिझ एएमजी, जीएलसी ४३ कोप, जीएलई, मर्सिडिझ एएमजी जीएलई ४३ कोप, जीएलएस, मर्सिडिझ एएमजी जीएलएस ६३ आणि मर्सिडिझ एएमजी जी ६३यामध्ये भरीव वाढ झाली आहे आणि जानेवारी ते जून २०१८ या कालावधीत १५.९ टक्के इतक्या भरीव विकासाची नोंद झाली आहे. या प्रकारात जीएलसी, जीएलई आणि जीएलएस यांच्यासाठी प्रामुख्याने मागणी होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link