Next
‘डीकेटीई’च्या ३५ विद्यार्थ्यांची कॅपजेमिनी कंपनीत निवड
प्रेस रिलीज
Thursday, June 20, 2019 | 03:21 PM
15 0 0
Share this article:


इचलकरंजी : डीकेटीई संस्थेच्या इंजिनीअरिंग विभागामध्ये कॅपजेमिनी या कंपनीने आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये संस्थेच्या सर्वाधिक ३५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 
  
कॅपजेमिनी ही फ्रान्सस्थित जागतिक मानांकित सॉफ्टवेअर निर्मिती कंपनी असून, अनेक देशांमध्ये या कंपनीची कॉर्पोरेट कार्यालये आहेत. त्यातील पुणे येथे कार्यरत असलेल्या कंपनीच्या माध्यमातून ‘डीकेटीई’च्या ३५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी एकूण तीन फेऱ्या झाल्या. अॅप्टिट्युड, टेक्निकल आणि एचआर राउंड या सर्व फेऱ्यांमध्ये ‘डीकेटीई’च्या सर्व विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली.

संस्थेमध्ये इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये खास प्रशिक्षणवर्ग घेतले जातात; तसेच विद्यार्थ्यांच्या तयारीकडे विशेष लक्ष दिले जाते. या प्लेसमेंटसाठी संस्थेच्या इंजिनीअरिंग विभागाचे टीपीओ प्रा. जी. एस. जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

यशस्वी विद्यार्थी असे : कॉम्प्युटर विभाग- प्रीतम पाटील, राहुल खोत, रोहित परब, मुकुल कुलकर्णी, मृणाली कवळेकर, ओमकार कोईक, श्याम पटेल, श्रद्धा कारदगे, सिद्धार्थ किट्टद, निहित राठी, प्राजक्ता सोलगे, आकाश यादव, नेहा वैष्णव, ज्योती वर्मा. ईटीसी विभाग- रजनी पाटील, पूजा गावडे, प्रियांका पाटील, आमृता व्हरांबळे, प्रियांका गवड. इलेक्ट्रॉनिक्स विभाग- प्राजक्ता धुलुगडे, हारीनी विवेकानंदबाबू, अखिलेश केळकर, प्रथमेश पताडे, अमृता मुळे, पूजा पाटील, हर्षदा हाणबर, मानसी यलगार. आयटी विभाग- सुमन ओझा, पूजा पंजवाणी, स्नेहल चौगुले, विनायक कामत, धीरज गिड्डे, मीनाक्षी मुचंडी, सुप्रिया गोंधळी. 

या विद्यार्थ्यांना ‘डीकेटीई’चे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, डे.डायरेक्टर डॉ यू. जे. पाटील, उपसंचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, विभागप्रमुख डॉ. एस. ए. पाटील, विभागप्रमुख डॉ. डी. व्ही. कोदवडे यांसह सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. ‘डीकेटीई’चे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर. व्ही. केतकर, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे सर्व विश्‍वस्त व पदाधिकारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search