Next
कीर्तन सुमनांजली (द्वितीय पुष्प)
BOI
Thursday, July 19 | 10:32 AM
15 0 0
Share this story

कीर्तन परंपरेला पुढे नेणारे आणि सर्वसामान्यांपर्यंत हा ठेवा पोहोचविणारे सुमन राधाकृष्ण चौधरी यांनी केलेले हे लेखन आहे. कीर्तनांमधून सामाजिक प्रबोधन होते. लोकांना नैतिकतेचे धडे मिळतात. सुमन यांनी संतांचे हे आणि असे विचार पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकात गुरुमहिमा या विषयावर पहिले संस्कृत कीर्तन आहे. अन्य कीर्तने मराठीत आहेत. नारदीय कीर्तनपरंपरेला धरून हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. त्यामुळे यात पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग आहेत.

त्यांनी पूर्वरंगात निरूपणासाठी तुकाराम, रामदास, स्वरूपानंद या संतांचे अभंग निवडले आहेत. उत्तररंगात उपनिषदे, पुराण, महाभारत, रामायण व भागवत यामधील आख्याने आहेत. आख्यानात नेमके संवाद आले आहेत. केकावली, श्रीहरिपाठ, ज्ञानेश्वरी, गीता, सकलसंतगाथा, पंडित काव्य, संतकाव्य यांचा सुमन यांनी केलेला अभ्यास या पुस्तकातून दिसतो.

प्रकाशक : डॉ. राधाकृष्ण ल. चौधरी
पाने : ३४४
किंमत : २८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link