Next
दूध, दही पनीरचे पदार्थ, पौष्टिक पदार्थ
BOI
Wednesday, November 01 | 12:13 PM
15 0 0
Share this story

आपल्या रोजच्या जेवणात दूध, दही असायलाच हवे, असे म्हटले जाते; पण तेच तेच खाऊन कंटाळा येतो. मग काय करायचे... मग या दोन्ही पुस्तकांतील पदार्थ करून बघा. पहिल्या पुस्तकात निर्मला रहाळकर यांनी विविध प्रकारच्या खिरी बनवायला शिकवले आहे.

बंगाली पदार्थ किंवा पनीर पकोडे, मसालासारखे पनीरचे पदार्थ, चीजचे पदार्थ, बर्फीसारखे खव्याचे पदार्थ, ताकातल्या भाज्यांसह दह्याचे पदार्थ आणि खरवस, दहीवड्यासारख्या पदार्थांच्या कृतीही सांगितल्या आहेत.

दुसऱ्या पुस्तकात प्राजक्ता पावनगडकर यांनी वाढत्या वयाच्या मुलांसाठी पौष्टिक पदार्थ सांगितले आहेत. त्यात तिखट पदार्थांमध्ये कबाब, कटलेट, विविध उसळी, पराठे शिकवले आहेत. शिवाय रोल्स, वड्या, कोशिंबीर, सँडविचही शिकायला मिळते. गोड पदार्थांमध्ये पुऱ्या, वड्या, खीर, लाडू, हलव्याच्या कृतींचा समावेश आहे. 

प्रकाशक : साठे प्रकाशन
पाने : १६८
किंमत : १३५ रुपये  
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link