Next
हिमायतनगर शहरात पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकार
नागेश शिंदे
Monday, July 22, 2019 | 05:36 PM
15 0 0
Share this article:


हिमायतनगर : जुलै महिना संपत आला, तरी हिमायतनगरमध्ये पावसाचे आगमन झाले नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर येथे हदगाव-हिमायतनगर मतदारसंघाचे आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकार महायज्ञाला सुरुवात करण्यात आली आहे. 

वरुणराजाला प्रसन्न करून पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी श्री परमेश्वर मंदिर संस्थानात २१ ते २७ जुलै या कालवधीत या महायज्ञाचे आयोजन केले आहे. दुष्काळ नियंत्रित करण्यासाठी हिमायतनगर शहरातील यज्ञसमितीच्या सदस्यांतर्फे यज्ञ सामुग्रीमध्ये १२ गावचे पाणी, त्रिवेणी संगमाचे पाणी, गावातील पेनगंगा नदीचे पाणी, दोन नद्या संगमाचे पाणी, घोड्याच्या गोठ्यातील माती, वारुळाची माती, नदीकाठची माती, तसेच पळस, उमर, पिंपळ, खैर, कावस, हराळी, रुचकि, चंदन, गुलाब जल, उजैनची राळ, बुरा आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. 


हिमायतनगर शहरात १९८८नंतर प्रथमच २०१९ला आमदार आष्टीकर यांच्या प्रयत्नाने महायज्ञाचे आयोजन केल्याचे संतोष गाजेवार यांनी सांगितले. या महायज्ञास नाशिक येथील ब्राह्मणांच्या हस्ते पूजा करण्यात येत आहे. यासाठी ११ यज्ञकुंड आणि दररोज ३०० जोडपी या यज्ञास बसणार आहेत. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजनही नित्यनेमाने केले जात आहे. महायज्ञाच्या पहिल्याच दिवशी २०३ जोडप्यांनी यज्ञ केले. त्यात कामारी पंचायत समिती गटातील वाघी येथील ५१ जोडप्यांनी हिमायतनगर येथे येऊन यज्ञ केल्याचे वाघी येथील सरपंच नागोराव माने पाटील यांनी सांगितले.


या महायज्ञास बसणाऱ्या सर्वच जोडप्यांना दस्ती टोपी, पिस देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. यज्ञाला बसलेल्या सर्वच जोडप्यांना यज्ञ समाप्तीच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक एक वृक्ष भेट देऊन त्यांच्या संगोपनाची जबाबदारी दिली जाणार आहे.

परिसरातील व पंचक्रोशीतील भाविकांनी या पर्जन्ययाग रुद्र स्वाहाकार महायज्ञ सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन यज्ञ समितीचे आयोजक गाजेवार यांनी केले आहे. 

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search