Next
पुण्यात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
BOI
Friday, June 21, 2019 | 01:00 PM
15 0 0
Share this article:

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला.

पुणे :  पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, बी. जे. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ननंदकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बी. जे. महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला. पुणे जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग व उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, योग संघटना आणि बी. जे. महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  जिल्हास्तरीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे, तहसिलदार प्रशांत आवटी, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. गणपतराव मोरे, ऑलिम्पीयन मनोज पिंगळे, अर्जुन पुरस्कार विजेत्या शकुंतला खटावकर, शासकीय अधिकारी, कर्मचारी, शैक्षणिक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आंतरराष्ट्रीय योग परीक्षक हेमा शहा यांनी उपस्थितांना योगविषयी माहिती दिली. व्यासपीठावर स्कूल ऑफ योगा अँड रिसर्च सेंटरच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके करुन दाखविली व त्यानुसार उपस्थितांनी सर्व आसनांची प्रात्यक्षिके केली. या वेळी उपस्थितांना योग मार्गदर्शिका पुस्तिकेचे वाटपही करण्यात आले.

उपसंचालक अनिल चोरमले यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search