Next
मसाई
BOI
Monday, May 20, 2019 | 10:42 AM
15 0 0
Share this article:

पूर्व आफ्रिकेत ब्रिटिशांची अन्यायी व निष्ठूर राजवट आणि तेथील मसाई या स्थानिक जमातीसाठी काम करणाऱ्या जेनिफर निकोल्सन यांच्या लढ्याची कहाणी उमेश कदम यांनी ‘मसाई’ या कादंबरीतून सांगितली आहे. 

कॅप्टन जेराल्ड निकोल्सन याची नेमणूक पूर्व आफ्रिकेत होते. पत्नी जेनिफर ऊर्फ जेनीसह तो नारोक येथे जातो. कालांतराने जोराल्डचा तापट, महत्त्वाकांक्षी स्वभाव जेनीला जाणवू लागतो; पण त्याकडे लक्ष न देता जेनी मसाई समाजात जनजागृती करण्याचे काम सुरू करते. महायुद्धाच्या काळात इंग्लंडला अन्नाचा तुटवडा जाणवत असल्याने जेराल्ड आफ्रिकेतून मसाईंची जनावरे पाठविण्यास सुरुवात करतो. यासाठी अर्थातच धाकदपटशा, धमक्या यांचा अवलंब केला जातो. याच कारणावरून मसाई समाजातील युवक करांबू जेराल्डचा खून करतो. पुढे जेनीच्या साक्षीमुळेच त्याला मृत्युदंडाऐवजी जन्मठेपेची शिक्षा होते. 

या दरम्यान, जेनी आपले जीवन मसाईंच्या उद्धारासाठी वाहून घेते. किकयू जमातीमधील जोमो केन्याटा यांच्या केनियाच्या स्वातंत्र्यलढ्यातही ती सहभाग घेते. यात भारताकडूनही पाठिंबा मिळतो. अशा वैशिष्ट्यपूर्ण पार्श्वभूमीवरील ही सत्यघटनेवर आधारित कहाणी उत्कंठापूर्ण आहे.      
     
पुस्तक : मसाई
लेखक : उमेश कदम
प्रकाशक : राजेंद्र प्रकाशन
पाने : १५१
किंमत : २०० रुपये 

(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search