Next
मोगुबाई कुर्डीकर, रतनबाई
BOI
Sunday, July 15, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर आणि गायिका-अभिनेत्री रतनबाई यांचा १५ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
.... 
मोगुबाई कुर्डीकर 

१५ जुलै १९०४ रोजी कुर्डीमध्ये (गोवा) जन्मलेल्या मोगुबाई या जयपूर-अत्रौली घराण्याच्या महान शास्त्रीय गायिका म्हणून ओळखल्या जातात. सुरुवातीच्या काळात त्यांनी चंद्रेश्वर भूतनाथ मंडळी आणि सातारकर स्त्री संगीत मंडळी अशा कंपन्यांबरोबर संगीत नाटकं केली. पुढे त्यांनी इनायत खान, बशीर खान आणि मुख्यत्वेकरून अल्लादियाँ खान यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं रीतसर शिक्षण घेतलं. असं म्हणतात, की अल्लादियाँ खानसाहेबांनी त्यांचं गाणं कानांवर पडल्यावर स्वतःहून त्यांना शिक्षण देण्याचं ठरवलं होतं. भारतभर दौरे करून पुढे मोगुबाईंनी आपल्या शास्त्रीय गायकीचं रसिकांना दर्शन घडवलं. त्यांना ‘गानतपस्विनी’ ही उपाधी मिळाली होती. १९६८ साली त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि १९७४ साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. त्यांची कन्या किशोरीताई आमोणकर यांनी आपल्या आईचा वारसा समर्थपणे चालवला होता. दहा फेब्रुवारी २००१ रोजी मोगुबाईंचं निधन झालं. 
.......  

रतनबाई

१५ जुलै १८९० रोजी जन्मलेल्या रतनबाई या गायिका आणि अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. त्या सुंदर आवाजात भजनं म्हणत असत. १९३०च्या दशकात त्यांनी काही सिनेमांतून कामं केली होती. त्यांची मुलगी शोभना समर्थ हिने पुढे पडदा गाजवला आणि दोन्ही नातींनी (नूतन, तनुजा) तर हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वोच्च शिखर गाठलं होतं. त्यांची भाची नलिनी जयवंत हीदेखील आत्याच्या पावलावर पाउल टाकत हिंदी सिनेसृष्टीत आघाडीची नायिका म्हणून झळकली होती. एक जानेवारी १९८६ रोजी रतनबाईंचा मृत्यू झाला. 
........

यांचाही आज जन्मदिन :
अभ्यासू विचारवंत आणि समीक्षक नरहर कुरुंदकर (जन्म : १५ जुलै १९३२, मृत्यू : १० फेब्रुवारी १९८२) 
लोकप्रिय वक्ते डॉ. शिवाजीराव भोसले (जन्म : १५ जुलै १९२७, मृत्यू : २९ जून २०१०) 
चरित्रकार चांगदेव खैरमोडे (जन्म : १५ जुलै १९०४, मृत्यू : १८ नोव्हेंबर १९७१) 
लेखक माधव कोंडविलकर (जन्म : १५ जुलै १९४१) 
लेखक ल. सि. जाधव (जन्म : १५ जुलै १९४५) 
(यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link