Next
‘सीईटी परीक्षेला सक्षमपणे सामोरे जावे’
‘डीकेटीई’मध्ये आयोजित मार्गदर्शनाला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Thursday, April 04, 2019 | 03:56 PM
15 0 0
Share this article:

इचलकरंजी : ‘एमएचटी-सीईटी ही परीक्षा बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांच्यादृष्टीने महत्त्वाची असून, येणारी सीईटी परीक्षा ही प्रथमच ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी गोंधळून न जाता सीईटी परीक्षेस सक्षमपणे सामोरे जावे,’ असे प्रतिपादन लातूर येथील शाहू कॉलेजचे प्रा. दिलीप देशमुख यांनी केले.

येथील ‘डीकेटीई’तर्फे नाट्यगृहामध्ये आयोजित ‘एमएचटी-सीईटी २०१९ ला सामोरे जाताना’ या विषयावरील आयोजित कार्यक्रमात काढले. ‘एमएचटी-सीईटी’बद्दल शेवटच्या टप्प्यामध्ये करायच्या तयारी संदर्भात त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले; तसेच सीईटी परीक्षेसंदर्भातील सर्व शंकांचे निरसन केले.

सांगली येथील रजपूत इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व केमिस्ट्री विषयातील अनुभवी तज्ज्ञ प्रा. एम. एस. रजपूत म्हणाले, ‘निव्वळ मार्क व फक्त डिग्री म्हणजे हुशारी नव्हे, दररोजचा दिवस विदाउट सिलॅबस आहे. अथक परिश्रम करा व जीवनामध्ये जिद्दीने आणि चिकाटीने आव्हानांना सामारे जा, यश नक्की मिळेल.’

‘डीकेटीई’चे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले म्हणाले, ‘बारावी हे आयुष्याला व करिअरला कलाटणी देणारे वर्ष आहे. वर्षभर अभ्यास केल्यानंतर एमएचटी-सीईटीचादेखील उत्तम अभ्यास करून, यश संपादन करून नामांकित कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन घेणे हे क्रमप्राप्त आहे त्यासाठी प्रमुख वक्त्यांनी दिलेल्या सुचना अंमलात आणा व करिअरचा मार्ग सुकर करा.’
 


दुसऱ्या सत्रामध्ये ‘डीकेटीई’तील सेमिनार हॉलमध्ये विज्ञान विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर व विभागप्रमुख, प्राचार्य यांच्यासोबत प्रा. देशमुख यांचे ‘ऑनलाइन एमएचटी-सीईटी २०१९’ या विषयावरील चर्चासत्र घेण्यात आले. या वेळी शिक्षकांच्या ‘सीईटी २०१९’बद्दल असणाऱ्या शंकांचे निरसन झाले.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. सूत्रसंचालन प्रा. सचिन कानिटकर व प्रा. शोभा पाटील यांनी केले. या वेळी डेप्युटी डायरेक्टर प्रा. डॉ. यू. जे. पाटील, डेप्युटी डायरेक्टर प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे, सर्व विभागप्रमुख, ‘डीकेटीई’चे प्राध्यापक, सर्व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. ए. के. घाटगे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search