Next
अलविदा २०१७ - भाग २
BOI
Thursday, December 28, 2017 | 12:45 PM
15 0 0
Share this article:२०१७ या वर्षात क्रीडा क्षेत्रात घडलेल्या उल्लेखनीय घटना आणि विविध क्षेत्रांतील मानाचे पुरस्कार कोणाकोणाला मिळाले, याचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने घेतलेला हा वेचक आढावा...

...........
क्रीडा क्षेत्र

१० जानेवारी  : ‘फिफा’कडून २०१६चा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून ख्रिस्तियानो रोनाल्डोची निवड. २०१७च्याच डिसेंबर महिन्यात त्याला मानाचा गोल्डन बॉलही मिळाला. गोल्डन बॉल मिळण्याची ही त्याची पाचवी वेळ आहे.

१४ जानेवारी  : रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत गुजरातचा संघ पहिल्यांदाच विजयी.

२८ जानेवारी  : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकून सेरेना विल्यम्सचा २३ ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विक्रम.

२९ जानेवारी : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस - पुरुष एकेरीत रॉजर फेडरर अजिंक्य

१२ फेब्रुवारी : भारताच्या अंध क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पराभव करून विश्वचषक दुसऱ्यांदा पटकावला. 

१३ फेब्रुवारी : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्ध विजय मिळवून भारतीय क्रिकेट संघाचा सलग १९ कसोटी सामन्यांत विजय.

१ मार्च : विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत जितू रायला सुवर्णपदक.

२१ मार्च : आयसीसी कसोटी क्रमवारी - फिरकीपटू रवींद्र जडेजा अव्वल. फलंदाजांमध्ये चेतेश्वर पुजारा दुसऱ्या स्थानावर.

२२ मार्च : भारतीय क्रिकेटपटूंच्या मानधनात दुप्पट वाढ.

५ एप्रिल ते २१ मे : आयपीएलचे दहावे पर्व. मुंबई इंडियन्स विजयी

५ एप्रिल : २०१६चा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून विस्डेनकडून विराट कोहलीचा सन्मान. २०१७मध्ये अनेक विक्रम. सलग चार कसोटी मालिकांमध्ये द्विशतक करणारा पहिला फलंदाज (१० फेब्रुवारी). वेगवान नऊ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम (२९ ऑक्टोबर). पाचवे द्विशतक. कर्णधार असताना ११ शतके करण्याचा गावस्करांचा विक्रम मोडला. एकाच वर्षातले दोन्ही प्रकारातील १०वे शतक (२६ नोव्हेंबर). सहावे द्विशतक (६ डिसेंबर)

६ एप्रिल : फिफा क्रमवारीत भारत १०१वा. दोन दशकांमधील सर्वोत्तम स्थान.

१६ एप्रिल : सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी. साईप्रणितचा के. श्रीकांतवर विजय. दोन भारतीय खेळाडू आमनेसामने येण्याची पहिलीच वेळ. दोघांचेही गुरू पी. गोपीचंद.

१५ मे : क्रिकेटपटू दीप्ती शर्मा आणि पूनम राऊत यांची आयर्लंडविरुद्ध विश्वविक्रमी त्रिशतकी सलामी.

९ जून : फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णाचे गॅब्रिएला दाब्रोवस्कीसह विजेतेपद. त्याचे पहिले ग्रँडस्लॅम विजेतेपद.

१२ जून : स्पेनचा रफाएल नदाल ‘फ्रेंच ओपन’मध्ये विजेता. त्याचे दहावे विजेतेपद.

१२ जुलै : महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा मिताली राजचा विश्वविक्रम - १८३ सामने, ६०२८ धावा.

१५ जुलै : व्हीनस विल्यम्सचा पराभव करून स्पॅनिश खेळाडू गार्बिन मुगुरुझाकडे विम्बल्डनचे जेतेपद.

१६ जुलै : रॉजर फेडररचा आठ विम्बल्डन जिंकण्याचा विक्रम. ३५व्या वर्षी विम्बल्डन जिंकणारा पहिलाच.

६ ऑगस्ट : जागतिक अॅथलेटिक स्पर्धेत जमैकाच्या उसेन बोल्टला हरवून जस्टिन गॅटलिनला सुवर्ण. बोल्टची शेवटची स्पर्धा.

१७ सप्टेंबर : पी. व्ही. सिंधू कोरियन ओपन सुपर सीरिजमध्ये विजयी.

६ ते २८ ऑक्टोबर : ‘फिफा’ची १७ वर्षांखालील खेळाडूंची फुटबॉल विश्वकरंडक स्पर्धा प्रथमच भारतात. 

२९ ऑक्टोबर : किदाम्बी श्रीकांतकडे फ्रेंच ओपन सुपर सीरिजचे विजेतेपद. एकाच वर्षात इंडोनेशिया, ऑस्ट्रेलियन, डेन्मार्क आणि फ्रेंच अशा चार सुपर सीरिज जिंकणारा पहिला खेळाडू.

१ नोव्हेंबर : राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत हीना सिद्धूला १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक.

१ नोव्हेंबर : क्रिकेटपटू आशिष नेहराची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती.

५ नोव्हेंबर : महिला हॉकी आशिया चषक १३ वर्षांनंतर पुन्हा भारताकडे. २०१८च्या विश्वचषक स्पर्धेत प्रवेश.

८ नोव्हेंबर :
तीन मुलांची आई असणाऱ्या मेरी कोमचे आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत पाचवे सुवर्णपदक.

३ नोव्हेंबर : साईकोम मीराबाई चानूचे जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक.

२७ नोव्हेंबर : फिरकी गोलंदाज अश्विनचे ५४ सामन्यांत ३०० कसोटी बळी. डेनिस लिलीचा ५६ कसोटींत ३०० बळींचा विक्रम मोडला.

१३ डिसेंबर : श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माचे एकदिवसीय सामन्यातले तिसरे द्विशतक.

१७ डिसेंबर : शिखर धवनच्या शतकाच्या जोरावर भारताची श्रीलंकेवर एकदिवसीय सामन्यात मात. भारताचा हा सलग आठवा एकदिवसीय मालिकाविजय.

२२ डिसेंबर : रोहित शर्माचे श्रीलंकेविरुद्ध टी- २० सामन्यात ३५ चेंडूंत शतक.

विविध क्षेत्रांतील पुरस्कार

३ जानेवारी :
विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक मारुती चितमपल्ली यांना.

२५ जानेवारी : शरद पवार, यू. आर. राव, डॉ. मुरलीमनोहर जोशी, गायक येसूदास, सद्गुरू जग्गी वासुदेव यांना ‘पद्मविभूषण’

१३ फेब्रुवारी : तबलावादक संदीप दास यांना ‘जागतिक संगीत’ प्रवर्गात संयुक्तपणे ग्रॅमी पुरस्कार.

१५ फेब्रुवारी : ‘लॉरियस स्पोर्टस्मन ऑफ दी इयर’ हा जागतिक क्रीडा पुरस्कार धावपटू उसेन बोल्ट व महिला जिम्नॅस्ट सिमॉन बिल्स यांना प्रदान.

१९ फेब्रुवारी : गानसरस्वती महोत्सवात विदुषी गिरीजादेवी यांना गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर पुरस्कार प्रदान.

२१ फेब्रुवारी : साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर. मिलिंद चंपानेरकर यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस दीर्घपत्र’ या अनुवादित पुस्तकासाठी पुरस्कार. मराठी भाषेतील साहित्यासाठीचा पुरस्कार आसाराम लोमटे यांच्या ‘आलोक’ या लघुकथासंग्रहाला.

२७ फेब्रुवारी : ‘मूनलाइट’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार.

२७ फेब्रुवारी : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा ‘जनस्थान पुरस्कार’ ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांना ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या हस्ते प्रदान

२७ फेब्रुवारी : पद्माकर शिवलकर व राजिंदर गोयल या क्रिकेटपटूंना आणि महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ‘सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

९ मार्च : ज्येष्ठ कोकणी लेखक महाबळेश्वर सैल यांना २०१६चा सरस्वती सन्मान जाहीर. के. के. बिर्ला फाउंडेशनकडून हा पुरस्कार देण्यात येतो. सैल यांनी कोकणी आणि मराठी भाषेत अनेक रचना लिहिल्या आहेत. मराठीत चार नाटके, कोकणी भाषेत सात कादंबऱ्या  त्यांनी लिहिल्या असून, त्यांच्या ‘हावठण’ कादंबरीत कुंभार समुदायाचे सांस्कृतिक संशोधन आढळते. विविध भाषांमधील त्यांच्या २२ कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.

९ मार्च : मुंबई क्रिकेटला गौरव मिळवून देणारे ज्येष्ठ क्रिकेटपटू पद्माकर उर्फ पॅडी शिवलकर यांना भारतीय क्रिकेट मंडळातर्फे जीवनगौरव पुरस्कार. विराट कोहलीला पॉली उम्रीगर पुरस्कार.

७ एप्रिल : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘कासव’ला सुवर्णकमळ, ‘दशक्रिया’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, ‘व्हेंटिलेटर’ला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार

१८ मे : खगोलशास्त्रातील अमूल्य योगदानाबद्दल भारतीय शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना प्रतिष्ठेचा डॅन डेव्हिड पुरस्कार जाहीर.

३० एप्रिल : महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘कासव’ सर्वोत्कृष्ट.

३ मे : चित्रपट निर्माते, अभिनेते के. विश्वनाथ यांना २०१६चा दादासाहेब फाळके पुरस्कार. सर्वोत्तम अभिनेत्यासाठीचा पुरस्कार अक्षयकुमारला.

७ मे : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना रयत शिक्षण संस्थेचा पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार जाहीर.

१७ मे : ‘फोर्ब्ज मिडल ईस्ट’तर्फे ‘टॉप मिडल लीडर्स इन दी अरब वर्ल्ड २०१७’ या पुरस्काराने धनंजय दातार यांचा गौरव. अल अदिल ट्रेडिंग’चे अध्यक्ष असलेल्या दातार यांना मसाला किंग म्हणून ओळखले जाते.

१२ जून : पुण्यातील ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ आणि संचेती हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. के. एच. संचेती यांना न्यूयॉर्कच्या संस्कृती युवा संस्थेतर्फे भारत गौरव पुरस्कार.

१६ जून : भूपेन हजारिका राष्ट्रीय पुरस्कार लेखक येशे डोरजो ठोंगची यांना. ईशान्य भारताला मुख्य प्रवाहाशी जोडणाऱ्या व्यक्तींना सरहद संस्थेतर्फे दर वर्षी हा पुरस्कार दिला जातो.

२३ जून : साहित्य अकादमीच्या युवा आणि बालसाहित्य पुरस्कारासाठी मराठीतील लेखक राहुल कोसंबी आणि ल. म. कडू यांची निवड.

१४ ऑगस्ट : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) प्रमोद कुमार व चेतन चिता या कमांडिंग ऑफिसर्सना कीर्तिचक्र. प्रमोद कुमार यांचा मरणोत्तर गौरव.

२९ ऑगस्ट : दिव्यांग खेळाडू देवेंद्र झाझरिया आणि भारताचा माजी हॉकीपटू सरदार सिंग यांचा खेलरत्न पुरस्काराने गौरव. १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार, तर सात प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार. साहसी खेळासाठी दिला जाणारा ‘तेनसिंग नोर्गे’ पुरस्कार आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रोहन मोरे याला प्रदान.

१८ ऑक्टोबर : अमेरिकी लेखक जॉर्ज साँडर्स (५८) यांना ‘लिंकन इन दी बार्को’ या कादंबरीसाठी मॅन बुकर पुरस्कार. हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे अमेरिकी लेखक.

२०१७चे मॅगसेसे पुरस्कार विजेते :

योशिकी इशिजावा (जपान), गेट्सी षण्मुगम (श्रीलंका), फिलिपाइन एज्युकेशनल थिएटर असोसिएशन (फिलिपिन्स), टोनी टे (सिंगापूर), एबडोन नबाबन (इंडोनेशिया), लीला डी लिमा (फिलिपिन्स)

२०१७चे नोबेल पुरस्कार विजेते :

भौतिकशास्त्र :
लेझर इंटरफेरॉमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्व्हेटरीच्या (लायगो) निर्मितीसाठी आणि गुरुत्वीय लहरींचे अस्तित्व सिद्ध केल्याबद्दल रेनर वाइस, बॅरी सी. बॅरिश आणि किप एस. थॉर्न या अमेरिकी शास्त्रज्ञांना. गुरुत्वीय लहरींच्या संशोधनात भारतीय शास्त्रज्ञांचाही सहभाग असल्याने एक प्रकारे त्यांचाही सन्मान.

रसायनशास्त्र : स्वित्झर्लंडमधील जॅक्स ड्युबोशे, अमेरिकेतील जोआकिम फ्रॅंक आणि इंग्लंडमधील रिचर्ड हँडरसन यांनी जैविक रेणूंच्या (बायोमॉलिक्युल्स) अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये अनुकूल बदल घडवले. त्याबद्दल त्यांना नोबेल

फिजिऑलॉजी/मेडिसिन : बायोलॉजिकल क्लॉकवरील संशोधनासाठी जेफ्री सी. हॉल, मायकल रॉसबॅश आणि मायकल डब्ल्यू. यंग या अमेरिकी शास्त्रज्ञांना.
साहित्य : जपानी-ब्रिटिश कादंबरीकार काझुओ इशिगुरो.

शांतता : जगातील अण्वस्त्रे नष्ट होण्यासाठी काम करणाऱ्या इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लियर वेपन्स (ICAN) या स्वयंसेवी संस्थेला.

अर्थशास्त्र : मानवी स्वभावाच्या अर्थशास्त्रावर होणाऱ्या परिणामांबद्दल केलेल्या संशोधनाबद्दल अमेरिकी अर्थतज्ज्ञ डॉ. रिचर्ड एच. थॅलर यांना.

(२०१७चा अन्य क्षेत्रांतील आढावा https://goo.gl/aLBXVz या लिंकवर वाचता येईल.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search