Next
ज्ञानकोशकार केतकर यांच्या स्मृतिदिनी कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Tuesday, April 09, 2019 | 12:51 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त केतकर कुल मध्यवर्ती सभेतर्फे बुधवारी, १० एप्रिल २०१९ रोजी सकाळी सात वाजता कमला नेहरू पार्क येथील केतकर यांच्या समाधी स्थळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या कार्यक्रमाला प्रा. श्याम भुर्के, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, तसेच राजकीय, सामाजिक शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

या वेळी ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल. त्यानंतर श्याम भुर्के यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात येईल. 

केतकर कुलबंधू, भगिनींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केतकर कुल मध्यवर्ती सभेने केले आहे.

कार्यक्रमाविषयी :
ज्ञानकोशकार श्रीधर केतकर यांना श्रद्धांजली 
स्थळ : कमला नेहरू पार्क, केतकर यांचे समाधीस्थळ  
दिवस व वेळ : बुधवार, १० एप्रिल, सकाळी सात वाजता



 (श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. त्यांचा ज्ञानकोश ऑनलाइन वाचण्यासाठी येथे क्लिक करा. त्यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search