Next
फिरस्ते
BOI
Wednesday, April 25 | 10:12 AM
15 0 0
Share this story

दुर्गम भागात केलेल्या सफरीवर आधारित अभिषेक कुंभार यांनी लिहिलेली ही कादंबरी आहे. प्रसाद, समीर, सूरज, भूषण, पंकज, योगेश, युवराज आणि अभिषेक हे आठ तरुण लडाखला जायचं नक्की करतात. त्यांच्या वाटेत अनेक अडचणी येतात. सह्याद्रीत हिंडलेल्या या मुलांना हिमालयाचे सौंदर्य जसे अनुभवायला मिळते, तशीच येथील भाषा, दऱ्याखोऱ्यात, अवघड रस्ते, खाणे यांची ओळख होते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तेथील माणसे आणि त्यांची संस्कृती समजते. ‘जगायला मिळणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. तसे अजूनही बरेच लोक फक्त श्वास घेत आहेत,’ असे म्हणताना ‘आयुष्याचा प्रवास वसूल जागा,’ या भूमिकेतून केलेले हे लेखन आहे. या तरुणांच्या बेधडक आयुष्यासारखेच लेखनाची भाषा ही बेधडक आहे. या तरुणांच्या जगात सुरू असलेली खळबळ आणि मनोव्यापार त्यातून समोर येतो.

प्रकाशक : अभिषेक कुंभार
पाने : १९२
किंमत : १७० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link