Next
‘तंबाखूमुक्त शाळा अभियानात नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा’
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचे आवाहन
प्रेस रिलीज
Thursday, May 30, 2019 | 05:07 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘तंबाखू आणि तंबाखूच्या धुरामध्ये निकोटीनसारखे सात हजारहून अधिक विषारी रसायने असतात. त्यामुळे व्यसनाधीन माणसास कॅन्सरसारखे दुर्धर आजार होतात. व्यसनाधीन व्यक्तीच नाही, तर त्यांचे कुटुंबही तंबाखूच्या व्यसनाचा बळी ठरत आहेत. राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन संयुक्तरित्या सुदृढ महाराष्ट्र बनविण्याचे कार्य करत असून, मुंबईसह राज्यातील शाळा तंबाखूमुक्त करण्यासाठीच्या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा आणि देशाची पिढी निरोगी करावी,’ असे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी आज केले.

जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त आज (३० मे २०१९) मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शहरात मोठ्या प्रमाणात वितरीत होणाऱ्या प्रतिकात्मक पेन हुक्का प्रतिकात्मक शैक्षणिक पेनने नष्ट करून शाळेत फक्त शिक्षणासाठीचाच पेन राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमस्थळी जनजागृतीपर संदेश देणारे पोस्टर्स लावण्यात आले; तसेच फुफ्फुसाची तपासणी करण्यात आली.


बडोले म्हणाले, ‘सलाम मुंबई फाउंडेशन तंबाखूविरोधी दिनानिमित्त व्यसनमुक्तीसारखे अभियान राबवित आहेत. त्यांचे हे कार्य हे कौतुकास्पद आहे. शाळांच्या परिसरात मिळणारा पेन हुक्का बंद करण्याचे काम राज्य शासन करीत असून, भविष्यात संपूर्ण शाळा या तंबाखूमुक्त करण्यासाठीचे प्रयत्न शासनाने सुरू आहेत.’ फाउंडेशनच्या पुढील कार्यासाठी बडोले यांनी शुभेच्छा दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search