Next
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना बासरीवादनातून सांगीतिक वंदन
BOI
Friday, September 21 | 04:29 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना त्यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त बासरीवादनातून मानवंदना देण्यात येणार आहे;तसेच ८१ दिव्यांनी त्यांचे औक्षण करून पाद्यपूजन केले जाणार आहे. पुण्यातील ‘सौरभ फ्ल्युट अॅकॅडमी’तर्फे शुक्रवारी, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराजवळील विष्णुकृपा हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे’, अशी माहिती संयोजक सौरभ वर्तक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पत्रकार परिषदेत माहिती देताना सौरभ वर्तक
सौरभ वर्तक म्हणाले, ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचा शिष्यपरिवार जगभर आहे. त्यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त आम्हा शिष्यमंडळींकडून त्यांना सांगीतिक मानवंदना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे सामूहिक बासरीवादन होईल. मी स्वतः एकल बासरीवादन सादर करून त्यांना अभिवादन करणार आहे. त्यानंतर गुरुजींचे पाद्यपूजन व औक्षण केले जाईल. या वेळी तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते हरिप्रसाद चौरसिया यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.’ 

बासरी या वाद्याचा प्रसार करण्यासाठी ‘सौरभ फ्ल्युट अॅकॅडमी’ गेल्या वर्षभरापासून कार्यरत असल्याचेही वर्तक यांनी नमूद केले.

कार्यक्रमाविषयी 
पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना अभिवादन  
स्थळ : विष्णुकृपा हॉल, शनिवार पेठ
वेळ : शुक्रवार, २८ सप्टेंबर, सायंकाळी ६.०० वाजता
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link