Next
कारखान्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा राबविणार
कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Saturday, February 23, 2019 | 11:48 AM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘कंपनीत काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची असते. यामुळेच आपल्या कारखान्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेणाऱ्या कारखान्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा कामगार विभागामार्फत घेण्यात येणार आहे,’ कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले. राज्यात अशा प्रकारची स्पर्धा घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.

नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र येथे कामगार विभागाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना पुरस्कृत करण्यात आले. कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, ठाणे बेलापूर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. शाह, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक सुधाकर राठोड, कारखाने संचालक, व्यावसायिक, सुरक्षा लेखा परीक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.

पाटील-निलंगेकर म्हणाले, ‘कामगारांना उत्तम आरोग्य, सुरक्षितता व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कारखाना व्यवस्थापनाचा सहभाग हा मोलाचा आहे. येणाऱ्या काळात कारखाना व्यवस्थापनाने स्वयंस्फूर्तीने सुरक्षा कार्य संस्कृतीचे पालन करावे.’



कार्यक्रमादरम्यान कामगार विभागाशी संबंधित सर्व काम ऑनलाइन आणि डिजिटल होण्यासाठी, तसेच औद्योगिक सुरक्षा संबंधित माहिती, कामगारांना व संबंधितांना मिळण्यासाठी आरोग्य संचालनालयातर्फे संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले; तसेच राज्य शासनातर्फे सुरक्षा क्षेत्राशी निगडित कै. नारायण मेघाजी लोखंडे पुरस्कार या वेळी वितरित करण्यात आला. यामध्ये पहिला प्रवर्ग हा एकूण २५० कामगार असलेले कारखाने, प्रवर्ग दोन २५१ ते एक हजार कामगार असलेले कारखाने आणि प्रवर्ग तीनमध्ये एक हजार एक आणि त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या कारखान्यांना अशा एकूण तीन प्रवर्गात पुरस्कार वितरित करण्यात आले. यामधील पहिल्या पुरस्काराला सुवर्ण पदक व प्रमाणपत्र, दुसऱ्या पुरस्काराला रजतपदक व प्रमाणपत्र आणि तृतीय पुरस्काराला कांस्यपदक व प्रमाणपत्र देण्यात आले.

लोकार्पण केलेले संकेतस्थळ :
https://mahadish.in
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link