Next
शेअर्सचा नेमका अभ्यास महत्त्वाचा
BOI
Sunday, April 22 | 03:45 PM
15 0 0
Share this story

ज्यांना गुंतवणूक गांभीर्याने घ्यायची आहे, त्यांना शेअर बाजारात सतत अभ्यास आवश्यक असतो. हा अभ्यास शेअर बाजारात नोंद असलेल्या पाच हजार शेअर्सचा करावा लागत नाही. ज्याला मैलाचे दगड म्हणता येईल, अशा काही कंपन्यांचा अभ्यास तिथे गुंतवणूक केली नाही तरी आवश्यक असतो. याबद्दल पाहू या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
..........
शेअर बाजारात हौशे, गवशे, नवशेही असतात. त्यांना गुंतवणुकीत फार रस नसतो; पण थोडा विरंगुळा म्हणून किंवा वेळ घालवण्यासाठी म्हणूनही इथे काही लोक येतात; पण ज्यांना गुंतवणूक गांभीर्याने घ्यायची आहे, त्यांना शेअर बाजारात सतत अभ्यास आवश्यक असतो. हा अभ्यास शेअर बाजारात नोंद असलेल्या पाच हजार शेअर्सचा करावा लागत नाही. इतकेच नव्हे, तर निर्देशांकात समाविष्ट असलेल्या ३० किंवा ‘निफ्टी’त असलेल्या ५० शेअर्सचाही करायला लागत नाही. किंबहुना पैसे मिळवण्यासाठी अनेक मिड कॅप व स्मॉल कॅप कंपन्यांचाच अभ्यास आवश्यक ठरतो. कारण त्याच वाढत असतात; मात्र ज्याला मैलाचे दगड म्हणता येईल, अशा काही कंपन्यांचा अभ्यास तिथे गुंतवणूक केली नाही तरी आवश्यक असतो.

गेल्या आठवड्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), एसीसी आणि इंडसइंड बँक या तीन वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गज कंपन्यांचे मार्च २०१८चे तिमाहीचे व पूर्ण वर्षाचे आकडे प्रसिद्ध झाले. संगणन, सिमेंट व खासगी बँका अशा तीन क्षेत्रांमधल्या या कंपन्या होत्या.

इंडसइंड बँकेचे एकूण उत्पन्न ५८५८.६२ कोटी रुपये होते. फक्त नफा १४३३.८४ कोटी रुपये आहे. तिचं भागभांडवल ६०.०२ कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन १५.८८ रुपये दिसले. पूर्ण वर्षाचे बँकेचे उत्पन्न २२,०३०.८५ कोटी रुपये होते. करोत्तर नफा ५४८०.६८ कोटी रुपये होता व शेअरगणिक उपार्जन ६०.१९ रुपये होते. सध्या शेअरचा भाव १८१२ रुपये आहे. गेल्या बारा महिन्यांत कमाल भाव १८७८ रुपये होता व किमान भाव १३७५ रुपये होता. सध्याच्या भावाला किं./उ. गुणोत्तर ३८.१२ पट दिसते. रोज १५ ते १८ लक्ष शेअर्सचा व्यवहार होतो. हा शेअर २१०० रुपये होऊ शकेल. बँकेचे ३१ मार्च २०१७ तिमाहीचे एकूण उत्पन्न ५००१.३१ कोटी रुपये होते. नक्त नफा ११४२.१० कोटी रुपये होता व शेअरगणिक उपार्जन १२.५७ रुपये होते. दर वर्षी उपार्जन २५ टक्क्यांनी वाढते. पुन्हा शेअर जेव्हा १४०० रुपयांच्या आसपास येईल तेव्हा तो खरेदी करावा. सध्या शेअरचा भाव ३१९१ रुपये आहे. वर्षभरातला किमान भाव २२५३ रुपये होता. या तीन महिन्यांचे शेअरगणिक उपार्जन ३६.१ रुपये आहे. वर्षभरात भाव पुन्हा ३६०० रुपये व्हावा.

टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसचा (TCS) करोत्तर नफा ६९२५ कोटी रुपये होता. याच तिमाहीचा मार्च २०१७चा करोत्तर नफा ६६२२ कोटी रुपये होता. या वेळी नफ्यात ४.५७ टक्के वाढ आहे. या तिमाहीचा महसूल ३२०७५ कोटी रुपये होता. मार्च २०१७ तिमाहीपेक्षा तो आठ टक्के जास्त आहे. तिच्या कर्मचाऱ्यांची संख्या तीन लाख ९५ हजार आहे. ५०व्या वाढदिवसानिमित्त तिने १:१ बोनस दिला आहे. सध्या संगणक कंपन्यांना चांगले दिवस आहेत.

- डॉ. वसंत पटवर्धन

(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
चंद्रशेखर र. पाचलग About 267 Days ago
मागील 1 लेख चागलाच होता.त्या नंतर आत्ता काहीतरी वाचावयास मिळाले. माहीतिची वाट पहात आहे
0
0

Select Language
Share Link