Next
रत्नागिरी पोलिसांतर्फे नवनिर्माण महाविद्यालयात कार्यक्रम
BOI
Wednesday, October 17 | 05:03 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे हुतात्मा दिनानिमित्त नवनिर्माण महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे.

रत्नागिरी : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १६ ऑक्टोबर २०१८ रोजी येथील नवनिर्माण महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन केले होते; तसेच ‘शहीद पोलिसांचे व्यर्थ न जावो बलिदान’ या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.

लडाखमधील भारताच्या सीमेवर बर्फाच्छादित अशा हॉट स्प्रिंग या ठिकाणी २१ ऑक्टोबर १९५९ रोजी गस्त घालीत असलेल्या जवानांवर चीनी सैन्याने हल्ला केला. त्यामध्ये अनेक जवान शाहीद झाले. या अतुलनीय शौर्यापासून इतरांना स्फूर्ती मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रनिष्ठेची जाणीव व्हावी म्हणून दर वर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो.

पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांचे स्वागत करताना नवनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार शिंदे.या वर्षी शासनाकडून पोलीस हुतात्मा दिनानिमित्त जनमानसात त्यांच्या शौर्याची व बलिदानाची स्मृती जागृत राहावी व पोलीस विभागाबाबत आत्मीयता निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने २१ ऑक्टोबरला हुतात्मा दिनापूर्वी व्याख्यान, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य यांसारखे विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत.

या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस ठाणे व जिल्हास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. १६ ऑक्टोबरला नवनिर्माण महाविद्यालयात व्याख्यान आणि निबंध स्पर्धा झाली. यात प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्याला गौरविताना मान्यवर.

या वेळी हुतात्मा दिन या विषयावर पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, नवनिर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार शिंदे, रत्नागिरी आकाशवाणीचे कार्यक्रम निर्देशक सुहास विद्वांस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी पोलीस निरीक्षक शिरीष सासणे, पोलीस आयुब खान यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link