Next
‘एनटीटी डाटा’मध्ये ‘फ्लाइट बेस इंक’ प्रथम
‘एनटीटी डाटा ९.० ओपन इनोव्हेशन कॉन्टेस्ट’ची क्षेत्रीय अंतिम फेरी पुण्यात
प्रेस रिलीज
Saturday, January 12, 2019 | 11:13 AM
15 0 0
Share this article:पुणे : दी इंडस आंत्रप्रेन्युअर्सच्या (टीआयई) सहयोगाने आयोजित ‘एनटीटी डाटा ९.० ओपन इनोव्हेशन कॉन्टेस्ट’ची क्षेत्रीय अंतिम फेरी पुण्यात झाली. यामध्ये ‘फ्लाइट बेस इंक’ या कंपनीने प्रथम क्रमांक पटकाविला असून, टोकयो येथे १३ व १४ मार्च २०१९ ला होणार्‍या महाअंतिम फेरीत प्रवेश मिळविला आहे.

‘अल्टी झोन सिस्टिम्स प्रा.लि.’ला परीक्षक पुरस्कार, ‘सर्कल ऑफ लाइफ हेल्थकेअर प्रा.लि.’ला सोशल इम्पॅक्ट पुरस्कार आणि ‘एसस्क्वेअर आयओटी प्रा.लि.’, ‘केएफएक्स सर्किट्स अ‍ॅंड सिस्टिम्स प्रा.लि.’, ‘इनफिलेक्ट टेक्नोलॉजीज प्रा.लि.’ यांना झामा पुरस्कार मिळाला. या प्रसंगी ‘टीआयई’चे अध्यक्ष व मोजो नेटवर्क्सचे सहसंस्थापक किरण देशपांडे, ‘एनटीटी डाटा’च्या ओपन इनोव्हेशन अ‍ॅंड बिझनेस इनक्युबेशन विभागाचे प्रमुख कोटारो झामा, ओपन इनोव्हेशन अ‍ॅंड बिझनेस इनक्युबेशन विभागातील वरिष्ठ तज्ञ काज ओकाडा उपस्थित होते. या वेळी ‘बार्कलेज’चे व्यवस्थापकीय संचालक व हेड ऑफ बँकिंग प्रमोद कुमार यांचे बीजभाषण झाले.

जागतिक पातळीवर ‘ओपन इनोव्हेशन कॉन्टेस्ट ९.०’मध्ये १८ देशांतील ४०१ स्टार्टअप्सनी भाग घेतला. यामध्ये पुणे, बंगळुरू, मुंबई व इतर शहरांसह भारतातील ९१ स्टार्टअप्सचा समावेश होता. त्यापैकी जेडब्ल्यू मॅरिएटमध्ये झालेल्या क्षेत्रीय अंतिम फेरीत ११ स्टार्टअप्सची निवड झाली होती.

या प्रसंगी किरण देशपांडे म्हणाले, ‘स्टार्टअप्समध्ये त्यांच्या सेवेत वेग, अभिनवता व केंद्रित दृष्टीकोन बघायला मिळतो, ज्याचा अभाव कदाचित प्रस्थापित व्यवसायांमध्ये जाणवतो; मात्र ‘एनटीटी डाटा’ने हे सिद्ध केले आहे, की जागतिक पातळीवरच्या प्रस्थापित कंपन्या स्टार्टअप्सबरोबर परस्पर लाभदायक भागीदारी निर्माण करू शकतात. ‘एनटीटी डाटा’ आणि स्टार्टअप्सना सहकार्य करताना आम्हाला अत्यंत आनंद होत असून, यामुळे भारतात अशा भागीदारांना चालना मिळेल.’

कोटारो झामा म्हणाले, ‘ज्या देशांत या स्पर्धेचे आम्ही आयोजन करतो, त्या देशातील सर्वांत यशस्वी आणि विश्‍वसनीय संस्थांबरोबर आम्ही भागीदारी करतो. ‘टीआयई’बरोबर भागीदारी करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.’

परीक्षक मंडळात रेणू इलेक्ट्रॉनिक्सचे संस्थापक अजय भागवत, अल्गो अ‍ॅनालिटिक्सचे सीटीओ सतीश धूपडाळे, के स्टार्ट कॅपिटलचे भागीदार रेवंत भाटे, ‘एनटीटी डाटा’च्या ओपन इनोव्हेशन अ‍ॅंड बिझनेस इनक्युबेशन विभागाचे प्रमुख कोटारो झामा, ओपन इनोव्हेशन अ‍ॅंड बिझनेस इनक्युबेशन विभागातील वरिष्ठ तज्ञ काज ओकाडा यांचा समावेश होता.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search