Next
कर्करोग निदानासाठीच्या तपासण्यांचे रत्नागिरीत शिबिर
BOI
Tuesday, October 02, 2018 | 12:25 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी :
स्त्रियांच्या स्तनांच्या व गर्भाशयाच्या कर्करोग निदानासाठी आवश्यक असलेल्या मॅमोग्राफी आणि कॉल्पोस्कोपी तपासणीच्या ‘संकल्प २०१८’ या शिबिराला रत्नागिरीत एक ऑक्टोबर २०१८पासून सुरुवात झाली. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल-माधव फाउंडेशन आणि परकार हॉस्पिटलतर्फे हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, शिबिराचे यंदा दहावे वर्ष आहे. हे शिबिर १३ ऑक्टोबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी पाच या वेळेत परकार हॉस्पिटलमध्ये सुरू राहणार आहे.दीपप्रज्ज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. त्या वेळी प्रमुख पाहुण्या डीवायएसपी प्रिया ढाकणे म्हणाल्या, ‘मैत्रिणीच्या आईला कॅन्सर झाल्याचे निदान झाले आणि १५ दिवसांतच तिचा मृत्यू झाला. अचानक असे संकट कोसळल्याने आपण काहीच करू शकत नाही. अशा वेळी कुटुंब हादरून जाते. त्यामुळे विशेषतः महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये.’

फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे पीआरओ डॉ. आशुतोष मुळ्ये यांनी तपासणी शिबिराची माहिती सांगितली. जनरल मॅनेजर तानाजी काकडे यांनी फिनोलेक्स कंपनीच्या सीएसआर पार्टनर असलेल्या मुकुल माधव फाउंडेशनतर्फे रत्नागिरीसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. सन २०१४पासून वर्षातून दोनदा मॅमोग्राफी व कॅल्पोस्कोपी तपासणी शिबिर घेतले जाते. आतापर्यंत तीन हजार महिलांची तपासणी याअंतर्गत करण्यात आली आहे. डॉ. अनुप करमरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

डॉ. अलिमियाँ परकार यांनी सांगितले, ‘फिनोलेक्सचे वुमेन्स वेलबीइंग क्लिनिक परकार हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. महिलांसाठी फिनोलेक्सचे तपासणी शिबिराचे कार्य हे दीपस्तंभासारखे आहे. लवकर निदान झाले तर जीव वाचू शकतो. आजार बाल्यावस्थेत आढळला पाहिजे, म्हणजे योग्य उपचार करता येतात; मात्र याकडे लोक दुर्लक्ष करतात.’अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. ठोंबरे म्हणाले, ‘पूर्वीच्या काळात संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होता. त्यावर अनेक औषधे काढून आपण विजय मिळवला; मात्र आता असंसर्गजन्य रोगांमुळे अनेक लोक ग्रस्त झाले आहेत. शासनातर्फे डायबेटीस, ब्लड प्रेशर, कर्करोग यांचे स्क्रीनिंग केले जाणार आहे. त्या आजारग्रस्त झालेल्यांना पुढील उपचार दिले जातील.’

अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले, ‘महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. जागरूक राहिले पाहिजे. महिलांमध्ये स्तन व गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण भरपूर वाढले आहे. पूर्वी चाळिशीत हा कॅन्सर व्हायचा. आता तिशीमध्ये कॅन्सर निदर्शनास येऊ लागला आहे. महिला सशक्त असेल, तर घर पुढे जाते. फिगर मेंटेन करण्यासाठी अनेक माता आपल्या बाळांना स्तनपान करत नाहीत; पण ज्या स्त्रिया स्तनपान करवतात त्या महिलांना कॅन्सर होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे महिलांनी बाळाला वर्षभर तरी स्तनपान केले पाहिजे.’

शिबिरासंबंधी संपर्क 
१३ ऑक्टोबरपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे. मॅमोग्राफी आणि कॉल्पोस्कोपी या तपासण्या स्त्रियांच्या स्तनांच्या व गर्भाशयाच्या कर्करोग निदानासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या तपासण्या सोप्या, सुलभ व वेदनारहित असून, केवळ १५ मिनिटांत होतात.

अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. लेले – ९९६०४ ५६०६२
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link