Next
‘जीविधा’तर्फे पुण्यात हिरवाई महोत्सव
प्रेस रिलीज
Wednesday, June 20 | 04:04 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘जीविधा संस्थेतर्फे इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे २१ ते २३ जूनदरम्यान हिरवाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक देशी वनस्पतींच्या लागवडीसाठी जनजागृती, व्याख्यानमाला, पुस्तक प्रकाशने, रोपांचे वाटप असे या महोत्सवाचे स्वरूप आहे. हिरवाई महोत्सवाचे हे आठवे वर्ष आहे,’ अशी माहिती ‘जीविधा’चे संचालक राजीव पंडित यांनी दिली.

गुरुवारी २१ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता  ‘रानभाज्या : रानातून पानात’ या विषयावर प्रा. प्र. के. घाणेकर यांचे व्याख्यान होणार आहे. २२ जून शुक्रवारी  सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. विनया घाटे, प्रीती कोरे, आडकर यांच्या ‘सातारा जिल्ह्यातील देवराया’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या वेळी प्रधान वन संरक्षक जीत सिंग उपस्थित राहणार आहेत. त्यांनतर ‘गड आणि वनस्पती संवर्धन’ या विषयावर डॉ. राहुल मुंगीकर यांचे व्याख्यान होणार आहे.

२३ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजता डॉ. हेमा साने यांचे ‘शाश्वत विकास’ या विषयावर व्याख्यान होणार आहे; तसेच या विषयावरील त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्यानंतर देवराई ट्रस्टतर्फे देशी वनस्पतींच्या रोपांचे वाटप करण्यात येणार आहे.

महोत्सवाविषयी :
कालावधी :
२१ ते २३ जून २०१८
वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
स्थळ : इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, पुणे
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link