Next
‘वेदा’तर्फे शिक्षक गौरव पुरस्काराचे वितरण
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 11:48 AM
15 0 0
Share this story



पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या पी. ए. इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाइन अँड आर्ट (वेदा) यांच्या वतीने विविध शाळांचे मुख्याध्यापक व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना ‘शिक्षक गौरव पुरस्कार २०१९’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार डॉ. दीपक टिळक यांनी प्रदान केले.

शहरातील १० शाळांचे मुख्याध्यापक आणि १० महाविद्यालयांचे प्राचार्यांना या समारंभात गौरविण्यात आले. हा कार्यक्रम नुकताच आझम कॅंपसच्या हाय टेक हॉलमध्ये आयोजित केला होता. या वेळी सोसायटीच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार, सिटीस इन्फोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षद सांगळे, सोसायटीचे सचिव लतीफ मगदूम, सहसचिव इरफान शेख, प्राचार्य डॉ. ऋषी आचार्य उपस्थित होते.

शहरातील मुख्याध्यापक आणि प्राचार्यांचा बहुमान करण्याची ही प्रथा स्तुत्य असून, त्यामुळे सर्वांच्या योगदानाची दखल घेतली जात असल्याची भावना डॉ. टिळक यांनी या वेळी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link