Next
‘रोशे’तर्फे ‘हेमोफिलिया ए’ग्रस्तांसाठी ‘एमिसिझुमॅब थेरपी’ दाखल
प्रेस रिलीज
Thursday, April 18, 2019 | 05:40 PM
15 0 0
Share this article:

लारा बेझेरामुंबई : ‘फॅक्टर VIII इनहिबिटर्ससह हेमोफिलिया ए’ असणाऱ्यांसाठी भारतात ‘एमिसिझुमॅब’ थेरपी मंजूर केल्याचे ‘रोशे’ने जाहीर केले आहे. यास, रक्तस्रावाच्या प्रकारांची वारंवारिता रोखणारी किंवा कमी करणारे प्रोफिलॅक्टिक (प्रिव्हेंटिव्ह) उपचार म्हटले जातात. हेम्लिब्रा हे पहिले साप्ताहिक सबकटेनिअस (त्वचेच्या खाली) प्रोफिलॅक्सिस इंजेक्शन असून, ते रक्तस्रावाच्या प्रकारांची वारंवारिता रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी वापरतात. नैसर्गिक कॉग्युलेशन कॅसकेड सक्रिय करण्यासाठी व ‘हेमोफिलिया ए’ झालेल्यांसाठी ब्लड क्लॉटिंग प्रक्रिया सुरळित करण्यासाठी आवश्यक असणारे फॅक्टर ‘IXa’ व फॅक्टर ‘X’ प्रोटिन एकत्र आणण्याच्या दृष्टीने त्याची रचना केली आहे.

‘फॅक्टर VIII इनहिबिटर्ससह हेमोफिलिया ए’ असणाऱ्या व्यक्तींसाठी उपलब्ध असणाऱ्या सध्याच्या सर्व प्रोफिलॅक्टिक उपचार पर्यायांमध्ये आठवड्यातून अनेकदा इंट्राव्हेनस इन्फ्युजनची गरज भासते. त्यानंतरही, काही लोकांना सांध्यांतून स्राव होऊ शकतो व त्यामुळे दीर्घकाळात सांधे खराब होऊ शकतात. ‘एमिसिझुमॅब’ला मान्यता मिळणे, ही ‘हेमोफिलिया ए’ असणाऱ्यांसाठी महत्त्वाची प्रगती आहे. ‘इनहिबिटर्ससह तीव्र हेमोफिलिया ए’ असणाऱ्या व्यक्तींच्या उपचारांसाठी ही सर्वोत्तम घडामोड आहे. सर्व वयांमध्ये होणाऱ्या ‘हेमोफिलिया ए’साठी, हेम्लिब्राच्या क्लिनिकल एव्हिडन्सला सर्वंकष व सखोल विकास कार्यक्रमाचे पाठबळ आहे.

‘एमिसिझुमॅब (हेम्लिब्रा) उपलब्ध होणे, हा भारतातील ‘हेमोफिलिया ए’ उपचारांतील महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यातून ‘रोशे’ची उत्कृष्ट औषधे शक्य तितक्या लवकर भारतातील रुग्णांसाठी सादर करण्याची आमची बांधिलकी अधोरेखित झाली आहे. या प्रगत औषधामुळे ‘हेमोफिलिया ए’चे व्यवस्थापन करण्याचा पूर्णतः नवा मार्ग मिळाला आहे आणि त्यातून उपचारांना नवा आयाम मिळाला आहे. या नव्या थेरपीमुळे, रुग्णांना निरोगी व सक्रिय जीवन जगण्याची संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे,’ असे ‘रोशे फार्मा इंडिया’चे चीफ परपज ऑफिसर (एमडी) लारा बेझेरा यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search