Next
श्री गणेश देवतेचे अद्वितीय औचित्य
BOI
Tuesday, September 18, 2018 | 10:01 AM
15 0 0
Share this article:

आनंदाचा सोहळा असलेला गणेशोत्सव धामधुमीत सुरू आहे. देशात महाराष्ट्रासह अन्य राज्ये व अगदी परदेशांतही गणेशपूजन केले जाते. समाज संघटीत करणाऱ्या या देवतेची उपासना व विज्ञान यांचा संबंध यशवंत भास्कर सोहोनी यांनी ‘श्री गणेश देवतेचे अद्वितीय औचित्य’मधून उलगडला आहे. यासाठी श्री गणेश अथर्वशीर्ष व रामदास स्वामी रचित गणेश आरती प्रमाणभूत समजली आहे, असे लेखकाने सांगितले आहे.

अभिजात सहिष्णू गणेश देवता आणि आधुनिकवादी समाज, विश्वात्मक वेद परंपरा, इंडोनेशियाच्या चलनावरील श्री गणेश, विश्वव्यापी गणेश, अग्रमानांकित विज्ञान व अंतराभिमुख धर्म यांनी माहिती देत शिवपुराण व गणेश जन्म कथन केला आहे. मानवी उत्क्रांती व ध्यानधारणा, गाणपत्यर्थशीर्षातील गणेश देवतेचे वर्णन, रामदास स्वामी रचित गणेश आरतीतील समाज व गणपतीच्या परस्पर संबंधांचा उहापोह येथे केला आहे.

मणक्यांचे आजार व सकारात्मक विचारसरणी, मनोधारणा व व्याधी, वैज्ञानिक व आध्यात्मिक विचारसरणी अशा २० प्रकरणांमधून प्राचीन वेदिक परंपरा सुलभपणे मांडण्याचा प्रयत्न यात केला आहे.

प्रकाशक : संगीता दिलीप काळे
पाने : १७४
किंमत : १८० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search