Next
बाळ सत्यधारी महाराज मंडळाची केरळ पूरग्रस्तांना मदत
२५ हजार ५५१ रुपयांचा धनादेश रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द
BOI
Tuesday, September 11 | 03:09 PM
15 0 0
Share this story

मदतीचा धनादेश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे देताना बाळ सत्यधारी महाराज, डॉ. दिलीप पाखरे व सेवा मंडळाचे कार्यकर्ते.

रत्नागिरी : रत्नागिरी शहराजवळच्या खेडशी गावातील चांदसूर्या येथील स्वामी बाळ सत्यधारी महाराज सेवा मंडळाने केरळमधील पूरग्रस्तांसाठी २५ हजार ५५१ रुपयांची मदत केली आहे. या मदतीचा धनादेश त्यांनी नुकताच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला. 

या वेळी स्वामी बाळ सत्यधारी महाराज यांच्यासमवेत डॉ. दिलीप पाखरे, राहुल पवार, चंद्रकांत जोशी, संतोष कदम, अशोक बोंबले, सुरेश होतेकर, अरुण चव्हाण, मंगेश म्हादे, तुषार पावसकर, आशिष पानगले, राजाराम कांबळे, सुरेश नवले आदी उपस्थित होते. त्यांच्या या मदतीबद्दल सरकारच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले.

बाळ सत्यधारी महाराज सेवा मंडळ विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत आहे. यापूर्वी कारगिल युद्ध, तसेच लातूर येथील भूकंप आणि नैसर्गिक आपत्तीवेळी सेवा मंडळाने आर्थिक व वस्तुरूपाने मदत केली आहे. महाराजांच्या प्रयत्नांमुळे आजवर ९६ हजार जण व्यसनमुक्त झाले आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना राज्य सरकारचा व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. त्यांच्या या कार्याची माहितीसुद्धा या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link