Next
नंदुरबार येथे जनजाती चेतना परिषद
आदिवासींच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण
शशिकांत घासकडबी
Monday, December 24, 2018 | 11:17 AM
15 0 0
Share this article:नंदुरबार : जिल्ह्यातील आदिवासी भागात राहणाऱ्या जनजाती बांधवांनी देशाच्या रक्षणासाठी इंग्रजांविरोधात केलेल्या सातपुड्यातील ऐतिहासिक संघर्षाला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्याचे स्मरण करण्यासाठी येथे जनजाती चेतना परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात राहणारे जनजाती बांधव आज विविध सामाजिक, धार्मिक, राजकीय समस्यांच्या विळख्यात अडकले असले, तरी त्यांचा इतिहास गौरवशाली आहे. देशाच्या रक्षणासाठी इंग्रजांविरोधात केलेला सातपुड्यातील ऐतिहासिक संघर्ष ही त्यातील प्रमुख घटना आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या आंबापाणी व रावलापाणी येथे जालियनवाला बाग हत्त्याकांडाएवढाच मोठा व भीषण नरसंहार झाला. या संघर्षाला ७५ वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्त ही परिषद आयोजित केली होती.या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार सहाय यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून भारतीय नौसेनेचे अधिकारी लक्ष्मणराजसिंह मरकाम, अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या उपाध्यक्षा नीलिमा पट्टे, आयोजन समितीच्या सदस्य खासदार डॉ. हीना गावित, आमदार उदयसिंग पाडवी, डॉ. पुष्पा गावित, डॉ. प्रकाश ठाकरे, मधुकर गावित, डॉ. विशाल वळवी, मौल्या गावित, विरेंद्र वळवी, प्रा. छाया गावित, गणेश गावित, जत्र्याबाबा पावरा, प्रा. डी. के. वसावे आदी या वेळी उपस्थित होते.

परिषद सुरू होण्यापूर्वी शहरात शोभायात्रा काढण्यात आली. या परिषदेत प्रामुख्याने रावलापाणी संघर्षावरील माधव नाईक यांनी लिहिलेल्या आठवणींवर आधारित एका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याबाबत डॉ. पुष्पा गावित यांनी मार्गदर्शन केले. नंदकुमार सहाय, लक्ष्मणराजसिंह, नीलिमा पट्टे आदींनी वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन केले. डॉ. प्रकाश ठाकरे यांनी चेतना परिषदेचा उद्देश विषद केला. डॉ. विशाल वळवी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search