Next
हिमायतनगर नगरपंचायतीतर्फे दिव्यांगांना धनादेश वाटप
BOI
Friday, March 01, 2019 | 05:29 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर : शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ११७ दिव्यांग नागरिकांना २८ फेब्रुवारी २०१९ रोजी दिव्यांग टक्केवारीनुसार दोन हजार, दीड हजार आणि एक हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.

दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दिव्यांग टक्केवारीनुसार अर्थसहाय्य देण्याचा निर्णय हिमायतनगर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष कुणाल राठोड व उपनगराध्यक्ष मो.जावेद गनी यांनी घेतला होता. त्यानुसार हे वाटप करण्यात आले.



राज्य सरकारने निर्देशित केलेल्या प्रत्येक शासकीय कार्यालयास त्यांच्या उत्पन्नांपैकी नियोजित दिव्यांग टक्केवारीनुसार शहरातील दिव्यांग, अपंग, मूकबधिर, अंध, मतिमंद, बहू विकलांग व्यक्तींना साह्य करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार नगरपंचायतीच्या सभागृहात दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगराध्यक्ष कुणाल राठोड यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून उपनगराध्यक्ष मो.जावेद गनी उपस्थित होते.



या प्रसंगी नगरसेवक रामभाऊ ठाकरे, प्रभाकर अण्णा मुधोळकर, अनवर खान पठाण, अ.अखिल, सदाशिव सातव, फेरोज खान पठाण, सरदार खान पठाण, श्री. गुफरान, अशरफ खान, लक्ष्मीबाई भोरे, पंचफुलाबाई लोने, श्री. आहाद, सावन डाके, विनायक मेंडके, ज्ञानेश्वर शिंदे, शेख रहीम सेठ यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका व नगरपंचायतीचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search