Next
राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी डॉ. जगताप यांची फेरनिवड
प्रेस रिलीज
Wednesday, June 12, 2019 | 05:00 PM
15 0 0
Share this article:


पुणे : येथील राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलची बैठक १० जून २०१९ रोजी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सेलच्या अध्यक्षपदी डॉ. सुनील जगताप यांची, तसेच २०१८च्या कार्यकारिणीचीही फेरनियुक्ती करण्यात आली.

डॉ. सुनील जगतापबैठकीला डॉ. सुनील जगताप, डॉ. सुनील होनराव, डॉ. हेमंत तुसे, डॉ. अजितसिंह पाटील, डॉ. सिद्धार्थ जाधव, डॉ. राहुल सूर्यवंशी, डॉ. तुषार वाघ, डॉ. नितीन पाटील, डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. शशिकांत कदम, डॉ. बरगाळे, डॉ. प्रताप ठुबे, डॉ. परशुराम सूर्यवंशी, डॉ. गणेश निंबाळकर, डॉ. रवींद्र सुतार, डॉ. सुनील धुमाळ उपस्थित होते.

डॉक्टर डेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search