Next
कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३१वी जयंती साजरी
प्रेस रिलीज
Friday, September 28, 2018 | 02:17 PM
15 0 0
Share this storyऔंध : रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात २७ सप्टेंबरला पद्मभूषण कमवीर भाऊराव पाटील यांची १३१वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शंकरराव मगर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. मगर म्हणाले, ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी काळावर विजय मिळविला आहे. १९व्या शतकात विविध समाजसुधारकांनी आपले आयुष्य समाजकार्यासाठी वाहिले होते. त्यामध्ये डॉ. राजाराम मोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या उद्धारासाठी आपले आयुष्य समर्पित केले. १९व्या शतकात लॉर्ड मेकॉले यांनी शिक्षणासाठी झिरपता सिद्धांताचा वापर केला. वरच्या वर्गातील जनतेला फक्त शिक्षण दिले आणि भारतातील तळागळातील लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवले. लॉर्ड मेकॉले यांच्या झिरपत्या सिद्धांताला सुरुवातीला महात्मा फुले यांनी धक्का दिला. महात्मा फुले यांनी बहुजन समाजातील स्त्री पुरुषांना शिक्षण देण्याचे महान कार्य केले.’

‘फुले दाम्पत्याच्या शैक्षणिक कार्याचा वसा आणि वारसा भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांनी चालविला. म्हणूनच तळागाळातील सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळाले. त्यांनी लावलेल्या वृक्षाचा आज महावृक्ष झालेला दिसून येतो. सन २०१९मध्ये रयत शिक्षण संस्था १००व्या वर्षात पदार्पण करीत आहे. भाऊरावांनी बहुजन समाजातील  वेगवेगळ्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना एकाच छताखाली आणून शिक्षण दिले. त्यामुळे अज्ञान आणि अंधकाराच्या छायेत खितपत पडलेल्या आणि शिक्षणापासून वंचित असणारा बहुजन समाज शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आला. बहुजन समाजातील माणसे शिकली सवरली आणि त्यांचा उद्धार झाला.’

महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे म्हणाल्या, ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेल्या या महाविद्यालयात बीए, बीकॉम, बीबीए, बीहोक, एमए, एमकॉम असे इतर अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना चांली नोकरी मिळावी म्हणून महाविद्यालयात विविध शॉर्ट टर्म कोर्स सुरू करण्यात आले आहेत. येथे शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी हे महाविद्यालयाची संपत्ती आहे. महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांना आयआयटीसारख्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याचा वसा आणि वारसा चालवण्याचे कार्य आमच्या महाविद्यालयातील सर्व रयत सेवक करीत आहेत.’

या कार्यक्रमासाठी पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे चेअरमन दत्तात्रय गायकवाड आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. सुहास निंबाळकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संजय नगरकर आणि डॉ. सविता पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. नलिनी पाचर्णे, डॉ. तानाजी हातेकर, प्रा. एकनाथ झावरे, प्रा. भीमराव पाटील, प्रा. सुप्रिया पवार, प्रा. किरण कुंभार, डॉ. अतुल चौरे उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link