Next
‘धारावीला शहराप्रमाणे विकसित करण्याला काँग्रेसचे प्राधान्य’
धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावर एकनाथ गायकवाडांनी स्पष्ट केली भूमिका
प्रेस रिलीज
Thursday, April 18, 2019 | 02:31 PM
15 0 0
Share this article:मुंबई : ‘मुंबईच्या सध्याच्या पायाभूत सुविधांवर कोणताही अतिरिक्त ताण न टाकता धारावीला एखाद्या नव्या शहरासारखे उभे करण्याला आमचे प्राधान्य असेल,’ अशी भूमिका दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी मांडली.

मुंबईतील एका कार्यक्रमात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्येक झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिल २०१९ रोजी धारावी परिसरातील पदयात्रेदरम्यान माध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी धारावी पुनर्विकासाच्या प्रश्नावर विस्ताराने काँग्रेसची भूमिका मांडली.

‘धारावी ही आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असून, १२७ हेक्टर क्षेत्रावर तब्बल ५५ हजार कुटुंबांना सामावून घेतलेली ही वस्ती मुंबईच्या अगदी मधोमध वसली आहे. २००४ साली काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात धारावीच्या पुनर्विकासाची संकल्पना प्रथम मांडण्यात आली. त्याबाबतची एक महत्त्वाकांक्षी योजनाही त्यावेळी तयार करण्यात आली होती. ही बाब खरी आहे की राजकीय विरोधामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात धारावी प्रकल्पाला म्हणावा तसा वेग देऊ शकलो नाही; मात्र आम्ही धारावीकरांना मुलभूत स्वरूपाच्या पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. आता तर झोपडीधारकाला किमान पाचशे स्क्वेअर फुटाचे घर देण्याचे वचन काँग्रेसने दिले असून, या वेळी सत्तेवर आल्यानंतर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा आम्ही निश्चितपणे मार्गी लावू.’गायकवाड यांचा प्रचार दौरा
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार एकनाथ गायकवाड यांनी १७ एप्रिल २०१९ रोजी मतदारसंघातील वडाळा नायगाव, सायन कोळीवाडा येथील विजय नगर, पंचशील नगर, सिद्धार्थ नगर, कमलानगर परिसर, चेंबूरचे आचार्य महाविद्यालय, आनंद नगर, खारदेव नगर, निलम हॉटेल, वैभव नगर, तसेच उमरशी बाप्पा चौक, एमराल्ड चौक, स्वस्तिक पार्क, सिद्धार्थ कॉलनी, जयकिशन मंडईच्या परिसरात पदयात्रा काढून प्रचार केला. या शिवाय माहिमच्या मनोरमा नगरकर मार्ग ते जे. के. सावंत मार्ग, अजाजी मास्तर चाळ ते अण्णासाहेब पाटील मार्ग, पुरुषोत्तम वाडी ते यादव पाटीलवाडी, तर दादरच्या पालखेवाडी ते किर्ती कॉलेज परिसरातही त्यांनी मतदारांशी संपर्क साधला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search