Next
नऊ फेब्रुवारीला पुण्यात ‘सवाई एकांकिकोत्सव’
BOI
Thursday, February 07, 2019 | 03:23 PM
15 0 0
Share this story

पुणे : चतुरंग प्रतिष्ठानतर्फे पुणेकर रसिकांसाठी सवाई एकांकिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ फेब्रुवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० ते रात्री १० या वेळेत पुण्यातील भरत नाट्य संशोधन मंदिर येथे हा महोत्सव होणार आहे. या एकांकिकोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे.

यामध्ये तुरटी (महर्षी दयानंद महाविद्यालय, मुंबई), एकादशावतार (रामनारायण रुईया, मुंबई), मॅट्रिक (नाट्यवाडा, औरंगाबाद), आय अॅग्री (I Agree, आमचे आम्ही, पुणे) या चार एकांकिकांचा समावेश असणार आहे. या एकांकिकोत्सवाच्या प्रवेशिका तीन फेब्रुवारीपासून ऑनलाइन बुकिंग पद्धतीने, तसेच नेहमीच्या पद्धतीने सकाळ-संध्याकाळ थिएटरवर उपलब्ध होणार आहेत.

एकांकिकेमध्ये बदलत्या काळानुसार, परिस्थितीनुसार बदलत जाणारे कथाविषय, वैशिष्ट्यपूर्ण मांडणी, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, ध्वनी, प्रकाश, नेपथ्य आदी सर्वच बाबतींत होणारे नावीन्यपूर्ण प्रयोग या साऱ्याचे यथार्थ प्रतिबिंब या सवाई एकांकिका स्पर्धेत उमटते. यात युवा पिढी अभ्यासू वृत्तीने, कमालीच्या गांभीर्याने उत्तमोत्तम सादरीकरणासाठी प्रयोगशील असते. तरुणांची ही प्रचंड मेहनत, त्यामागची कळकळ जास्तीत जास्त नाट्यरसिकांपर्यंत जावी, युवा पिढीला जाणकार, दर्दी रसिक प्रेक्षक लाभावा आणि त्याच वेळी नाट्यरसिकांनाही युवा पिढीच्या धडपडीची, प्रयोगशीलतेची जवळून ओळख व्हावी या विचाराने चतुरंग प्रतिष्ठानने खास पुणेकर रसिकांसाठी या एकांकिकोत्सवाचे आयोजन करायला सुरुवात केली.

तिकीट बुकिंगसाठी वेबसाइट : ticketees.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link