Next
आणि ती पिल्लांना शोधत आली...
BOI
Thursday, March 29, 2018 | 04:19 PM
15 0 0
Share this story


तामखरवाडी (ता. शिरूर) : येथील रहिवासी रामदास खोमणे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना अचानक बिबट्याची काही पिल्ले आढळून आली. वन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची आई म्हणजेच बिबट्याची मादी तिथे आली आणि ती पिल्लांना शोधून घेऊन गेली. हा संपूर्ण प्रकार अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे. 

अन्नाच्या शोधात आई कुठेही गेली, तरी तिचे लक्ष आपल्या पिल्लांवरच असते. शिरूर तालुक्यातील तामखरवाडी येथे घडलेला हा प्रकार याचीच साक्ष देतो. खोमणे यांच्या शेतात ऊसतोडणी सुरू असताना, कामगारांना चार बिबट्याची पिल्ले आढळून आली. त्यांनी लगेचच याची माहिती वनविभागाला दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बिबट्याची पिल्ले ताब्यात घेतली. लहान पिल्लांचा त्यांची आई शोधत येते, असा अनुभव आणि विश्वास अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे त्यांनी ही पिल्ले एका कॅरटमध्ये ठेवले. जुन्नर येथील वनविभागाचे अधिकारी, तसेच बिबट्या निवारा केंद्राचे अजय देशमुख घटनास्थळी आले. त्यांनी सर्व बछड्यांना एका कॅरटमध्ये ठेवत शेतात सोडून दिले. रात्रीच्या सुमारास बिबट्याची मादी शेतात आली. तिने एक-एक करून सर्व बछड्यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. हा सर्व प्रकार वनविभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरात सध्या बिबट्याचे वास्तव्य वाढले आहे. मागील काही दिवसांपासून या परिसरात नागरिकांना बिबटे दिसत आहेत. यामुळे याठिकाणी पिंजरा बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

(बिबट्याची मादी पिल्लांना  शोधून,घेऊन जात असतानाचा व्हिडिओ सोबत देत आहोत)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link