Next
‘रामायण महोत्सवाद्वारे सर्व देशांना एकत्रित आणणे शक्य’
आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवात राज्यपालांचे प्रतिपादन
BOI
Wednesday, February 27, 2019 | 01:48 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘रामायण हे भारतीय जीवनमुल्यांचे एक सार असून, रामायण प्रेम, आदर, आज्ञाधारकता, सत्य आणि त्यागाची कथा आहे. असत्यावर सत्याचा विजय सिद्ध करणारी महागाथा असलेल्या या महाकाव्यामुळे नवीन पिढीचे विचार, आदर्श आणि चरित्र आकाराला येईल,’असा विश्वास महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केला.

राज्यपाल चे. विद्यासागर राव
राज्य पर्यटन विभागाच्यावतीने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानावर आयोजित आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. 

२५ फेब्रुवारी रोजी सुरू झालेल्या या महोत्सवात भारतासह, कंबोडिया, फिलिपाईन्समधील कलाकारांनी रामायण सादर केले. गुरुवारी, २८ फेब्रुवारी रोजी इंडोनेशियातील संगार परिपूर्णा ग्रुप या रामायण महोत्सवात सादरीकरण करणार आहे.

या वेळी पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पर्यटन विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंगल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांच्यासह कंबोडीया, फिलीपाईन्स आणि इंडोनेशिया येथील आमंत्रित उपस्थित होते.


राज्यपाल म्हणाले, ‘रामायणाचे मूल्य प्रत्येक भारतीयांच्या डीएनएचा एक भाग बनले आहे. बौद्ध, शीख आणि जैन याव्यतिरिक्त विविध भारतीय भाषांमध्ये रामायणाची अनेक भाषांतरे आहेत. कंबोडियन, इंडोनेशियाई, फिलिपिनो, थाई, लाओ, बर्मा आणि मलेशियन आवृत्तीतील रामायण आणि तिच्याशी संबंधित कथादेखील आपल्याला पाहायला मिळतात. रामायण ही एक अशी कथा आहे जी एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत, जवळपास सर्व भारतीय भाषांमध्ये, बऱ्याच परदेशी भाषा आणि बऱ्याच बोलीभाषांमध्ये सांगितली जात आहे. रामायण इंग्रजी, जर्मन, फ्रेंच आणि इतर परदेशी भाषांमध्ये अनुवादित झाल्यानंतर त्यांनी भारतीय संस्कृती आणि मूल्यांकडे जगभरातील अनेक विद्वान, दार्शनिक आणि विचारवंतांचे लक्ष वेधून घेतले आहे.’

‘रामायण महोत्सवाच्या माध्यमातून सर्व देशांना एकत्रित आणून त्या माध्यमातून फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. भारतासह अनेक देश रामायणाशी जोडले गेले आहेत. रामायण महोत्सवाच्या माध्यमातून या सर्व देशांना एकत्रित आणणे;तसेच देशभरातील रामायण सर्किटच्या विकासाला चालना देणे असे उद्देश साध्य होतील,’ असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला.

‘भारत, श्रीलंका आणि महाराष्ट्रात भगवान राम यांच्या जीवनाशी संबंधित अनेक ठिकाणे आहेत. पर्यटन विभागाने या ठिकाणाविषयी जागरुकता निर्माण केली पाहिजे आणि इतर राज्यांशी संबंधित रामायण सर्किट विकसित केले पाहिजेत,’ अशी अपेक्षाही राज्यपालांनी या वेळी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 49 Days ago
Tourist industries in these countries can form a council , and Promote regional tourism . This will help their economies , as well.
0
0
Bal Gramopadhye About 56 Days ago
Such events should be held in different countries , on a regular basis
0
0

Select Language
Share Link
 
Search