Next
‘बीबीएनजी’च्या राष्ट्रीय परिषदेचे ठाण्यात आयोजन
BOI
Saturday, February 02, 2019 | 12:41 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘‘ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल’ची (बीबीएनजी) राष्ट्रीय परिषद ‘घे भरारी’ येत्या दोन फेब्रुवारी रोजी ठाणे येथे होत असून, सुमारे एक हजारहून अधिक उद्योजक यात सहभागी होणार आहेत,’ अशी माहिती या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

‘२०१२ मध्ये नाशिक येथून सुरू झालेल्या बीबीएनजीचे जाळे राज्यात,तसेच विदेशातही पसरले असून, हजारो उद्योजक नेटवर्किंगद्वारे येथे जोडले गेले आहेत,’ असेही कुलकर्णी यांनी नमूद केले. 

ते पुढे म्हणाले, ‘ठाणे (प.) मधील आर. नेस्ट बँक्वेट येथे आयोजित या एक दिवसीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजता होणार असून, या वेळी भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रदीप पेशकार, पितांबरीचे रविंद्र प्रभूदेसाई, अतुल कुलकर्णी व विवेक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर दिवसभर चालणाऱ्या विविध सत्रांमध्ये अविनाश धर्माधिकारी ‘व्यवसाय हीच देशसेवा’, चंद्रशेखर टिळक ‘बदलती बाजारपेठ व व्यावसायिक’, मृगांतक परांजपे हे ‘जागतिक बाजारपेठेतील संधी’, संजय ढवळीकर हे ‘एनपीएचा चक्रव्यूह कसा भेदाल’ व शिवानंद अप्पाराज हे ‘हॉस्पिटलमधील व्यवसाय संधी’ यावर मार्गदशन करतील. त्यानंतर महिला उद्योजकांचे चर्चासत्र होईल. यामध्ये उद्योजिका वैशाली भट, नेहा कांदळगावकर व शरयू देशमुख सहभागी होतील. दरम्यान ‘बीटूबी’ सत्राचेही आयोजन करण्यात आले असून, यामध्ये कॅमलिन, पितांबरी, अशोका बिल्डकॉन, चितळे डेअरी, चाणक्य मंडळ या व अनेक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.’  

‘ही परिषद यशस्वी होण्यासाठी मुकुंद कुलकर्णी,विराज लोमटे, राजेंद्र बेडेकर, मधुरा कुंभोजकर व निखिलेश सोमण आदी सदस्य प्रयत्नशील आहेत. समारोपाच्या सत्रामध्ये उद्योजक प्रसन्न पटवर्धन व अजित मराठे यांच्या हस्ते प्रतिथयश उद्योजकांचा ‘उद्यम कौस्तुभ’ पुरस्काराने गौरव करण्यात येईल,’ असेही कुलकर्णी यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link