Next
डॉ. महेश केळुसकर, विलास सारंग
BOI
Monday, June 11, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘निस्त्याकाच्या सांबाऱ्यापासून वोवळांच्या वळेसरापर्यात कोकणातले सगळे रंग-गंध ज्यांच्या कवितांमधून गळयाक मिठी घालतंत,’ असे कवी डॉ. महेश केळुसकर यांचा आणि मराठीबरोबरच ज्यांनी इंग्लिश भाषेतही सातत्याने लेखन केलंय, अशा विलास सारंग यांचा ११ जून हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
......    
डॉ. महेश केळुसकर  

११ जून १९५९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या (तत्कालीन रत्नागिरी जिल्हा) कणकवली तालुक्यातील फोंडाघाटमध्ये जन्मलेले महेश केळुसकर हे कवी, कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी बालसाहित्यही लिहिलं आहे. आकाशवाणीवर कार्यक्रम अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. 

१९७६ साली सावंतवाडीच्या कोजागिरी कविसंमेलनात कविवर्य बोरकर यांच्या उपस्थितीत सतरा वर्षांच्या महेश यांनी ‘बाळगो नि मालग्या’ ही मालवणी कविता पहिल्यांदा स्टेजवर वाचून साक्षात बाकीबाब यांच्याकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळवली होती. मालवणी भाषेतल्या त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय आहेत. केळव्याच्या कोकण साहित्य संमेलनात तर मंगेश तेंडुलकरांनी त्यांना कडकडून मिठी मारून वर म्हटलं होतं, ‘कविता प्रेझेंट करण्याच्या बाबतीत माजो हात धरणारो आजून कोण जन्माक येवक नाय; पण आज तुझी ‘झिनझिनाट’ आयकताना मी थरारून गेलंय....’ 

जोर की लगी है यार!, कलमबंदी, निद्रानाश, साष्-टांग नमस्कार, व्हय म्हाराजा!, यू कॅन ऑल्सो विन, भुताचा आंबा आणि इतर गोष्टी, खिरमट, क्रमशः, झिनझिनाट, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षपदी अलीकडेच त्यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे.

(‘सोबता आमची जोडी’ ही डॉ. महेश केळुसकर यांची मालवणी कविता त्यांच्याच आवाजात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा. डॉ. केळुसकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
........

विलास गोविंद सारंग
 
११ जून १९४२ रोजी जन्मलेले विलास सारंग हे मराठीबरोबरच प्रामुख्याने इंग्लिश भाषेत लेखन करणारे कथाकार, कादंबरीकार, कवी, समीक्षक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. इंग्लिशमधून डॉक्टरेट मिळवल्यानंतर त्यांनी इराक आणि कुवेतमधल्या युनिव्हर्सिटीमध्ये इंग्लिशचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्षं काम केलं होतं. इंग्लंड, अमेरिका, कॅनडासारख्या देशातल्या काही जर्नल्समधेही त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. 

अक्षरांचा श्रम केला, आतंक, मॅनहोलमधला माणूस, सिसिफस आणि बेलाक्वा, सोलेदाद, रुद्र, चिरंतनाचा गंध, कविता : १९६९ -१९८४, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१४ एप्रिल २०१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.

(विलास सारंग यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link