Next
सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये मिनी टेकफेस्ट
BOI
Friday, September 27, 2019 | 03:37 PM
15 0 0
Share this article:

कुसगाव : सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स क्लबच्या वतीने २१ ते २३ सप्टेंबर या कालवधीत ‘मिनी टेकफेस्ट’चे आयोजन करण्यात आले होते. तीनशेहून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले होते. 

यामध्ये ‘इन्स्पिरो टॉक’, ब्रेनव्हेव रोबोटिक्स आणि कवी संमेलन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ब्रेनवेव्ह रोबोटिक्समध्ये विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, अभियांत्रिकी क्षेत्रातील अनेक संज्ञा आणि प्रात्यक्षिके याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘इन्स्पिरो टॉक’ मध्ये अभिनेते रंजनराज (कोटा फॅक्टरी फेम) यांनी त्यांच्या जीवन प्रवासाविषयी सांगितले. ब्रेनवेव्ह रोबोटिक्स स्पर्धेमध्ये अर्पित कुमार, विभोर नामदेव, शाश्वतपुरी गोसावी, मित पटेल या विद्यार्थ्यांच्या गटाने प्रथम क्रमांक  पटकावला.

सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. एम. एस. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी, डॉ. व्ही. व्ही. देवतारे, प्रा. वैशाली बस्ते, इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअर्स क्लबचे अध्यक्ष तथागत कुमार, उपाध्यक्ष नेहिन मकनोजिया आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search