Next
पुण्यातील मुलांची आंतरराष्ट्रीय रोबॉटिक्स स्पर्धेसाठी निवड
तुर्कस्तानमधील ‘फर्स्ट लेगो लीग’मध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व
BOI
Saturday, March 23, 2019 | 03:05 PM
15 0 0
Share this article:

‘रोबोमाईंड्स’चे संस्थापक प्रकल्पा भिडे आणि ख्रिस पिल्लई यांच्यासह विजेता ‘गॅगॅनॉट्स’ संघ.

पुणे : तुर्कस्तानमधील इझीर येथे येत्या मे महिन्यात होणाऱ्या ‘फर्स्ट लेगो लीग एफएलएल’ या खुल्या आंतरराष्ट्रीय रोबोट स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व पुण्यातील ‘रोबोमाईंड्स’ संस्थेतील नऊ मुले करणार आहेत. 

त्यामध्ये अदिति सावंत (विबग्योर हायस्कूल), ईरा करमरकर (अभिनव इंग्लिश माध्यमिक शाळा), ध्रुव सावंत (विबग्योर हायस्कूल), अनय चौहान (बिशप स्कूल),सिफर जिरगाले (डीएलआरसी), मिहिर मेलिंकीरी (लॉयला हायस्कूल ), आदित्य मेलिंकीरी (न्यू इंडिया स्कूल), युवान पटवर्धन (सेवासदन हायस्कूल) आणि सात्विक शर्मा (पिआयसीटी मॉडेल स्कूल) यांचा समावेश आहे. 

११-१३ वर्षे वयोगटातील नऊ मुलांच्या या संघाचे नाव ‘गॅगॅनॉट्स’ असे असून, मुंबई येथे जानेवारी २०१९ मध्ये झालेल्या ‘इंडिया-वेस्ट नॅशनल्स इव्हेंट’मध्ये या संघाने सर्वोत्कृष्ट रोबोट परफॉर्मन्स पुरस्कार पटकावत, ‘फर्स्ट लेगो लीग एफएलएल’ या खुल्या आंतरराष्ट्रीय रोबोट स्पर्धेमध्ये प्रवेश मिळवला.

इझीर येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये जगातील ७० देशांतील १०० हून अधिक संघ सहभागी होणार आहेत. त्यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी पुण्याच्या संघाला मिळाल्याने या मुलांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


मुंबईत झालेल्या ‘इंडिया-वेस्ट नॅशनल्स इव्हेंट’मध्ये ‘गॅगॅनॉट्स’ने थ्री-डी पेंटिंगच्या सहाय्याने चंद्राची प्रतिकृती तयार करून चंद्रावरील अंतराळयान तयार केले. त्याचबरोबर केंद्रप्रसारक शक्तीच्या तत्त्वाचा वापर करून पृथ्वीवरून उड्डाण घेण्या दरम्यान ज्या प्रकारे अंतराळयानावर गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव जाणवतो तसा प्रभाव निर्माण केला. हा प्रकल्प इंधन वाचविण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणातून अंतराळयान प्रक्षेपित करण्याऐवजी चंद्रावरून प्रक्षेपित करण्याच्या कल्पनेवर आधारलेला असेल. जेणेकरून पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामधून बाहेर पडताना जेवढ्या प्रमाणात इंधन वापरले जाते त्यापेक्षा कमी इंधन वापरले जाईल.

प्रकल्पा आणि ख्रिस बॅस्टियन पिल्लई या दांपत्याने २०१३ मध्ये सायन्स, टेक्नॉलॉजी, मॅथ्स आणि डिझाईन (एसटीईएम-डी) या विषयांच्या अनुभवात्मक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘रोबोमाईंड्स’ या तांत्रिक कार्यशाळेची पुण्यामध्ये स्थापना केली. ‘गॅगॅनॉट्स’ संघातील मुले ‘रोबोमाईंड्स’चे विद्यार्थी आहेत. सुरभी भंडारी यांच्या देखरेखीखाली ‘रोबोमाईंड्स’चे माजी विद्यार्थी, कनिष आणि सिद्धार्थ थियागराजन यांनी या गटाला प्रशिक्षण दिले. 

फर्स्ट आणि वर्ल्ड रोबो ऑलिम्पियाड असोसिएशन यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय रोबोट स्पर्धांसाठी ‘रोबोमाईंड्स’ ही कार्यशाळा अनेक संघांना प्रशिक्षण देत आहे. या स्पर्धा दर वर्षी ९० देशातून तीन लाख ५० हजार मुले आकर्षित करण्यास यशस्वी होतात. २०१४ पासून या स्पर्धांमध्ये ‘रोबोमाईंड्स’ सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करीत असून, ‘रोबोमाईंड्स’चे संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासह अनेक पुरस्कार पटकावत आहेत.

(‘रोबोमाईंड्स’विषयी अधिक माहिती वाचाण्यासाठी येथे क्लिक करा.) 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search