Next
आगाशे विद्यामंदिरात दहीहंडी उत्साहात
BOI
Saturday, September 01, 2018 | 04:08 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
भारत शिक्षण मंडळाच्या कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात एक सप्टेंबर २०१८ रोजी दहीहंडीचा सण बालगोविंदांनी उत्साहात साजरा केला. मुला-मुलींनी विविध कृष्णगीतांवर फेर धरून नृत्याचा आनंद लुटला. त्यानंतर दहीहंडी फोडण्यात आली.लहान वयापासून विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृतीचे संस्कार व्हावेत, या हेतूने शाळेत विविध उपक्रम आयोजित केले जातात. म्हणूनच दर वर्षी दहीहंडीचा सण शाळेत उत्साहात साजरा केला जातो. यंदाही शाळेतील ६५० विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षकांनी कृष्णगीतांवर फेर धरून नृत्य केले. शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून शाळेत दहीहंडीची तयारी सुरू झाली. श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर बालदोस्तांनी नृत्य सुरू केले. प्रत्येक वर्गाचा नृत्याचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.बच्चेकंपनी राधा-कृष्णाच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये नटूनथटून आली होती. मुलींच्या टिपरीनृत्याने कार्यक्रमाची शोभा वाढली. गोविंदांनी भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी दोन-तीन थरांवर हंडी फोडली. मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम व सर्व शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग
आगाशे विद्यामंदिरात कोणताही उपक्रम असला तरी पालकांचे भक्कम पाठबळ मिळते. दहीहंडीच्या कार्यक्रमातही नेहमीच त्यांचा सक्रिय सहभाग असतो. सर्व पालकांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला. दहीहंडी सजावट, बांधणी, प्रसाद बनविणे या सर्व कामांत पालकांनी सक्रिय भाग घेतला. पालक प्रतिनिधी, रिक्षावाले काका यांनीही बालगोपाळांच्या या दहीहंडीसाठी मदत केली. 

(बालगोपाळांच्या या दहीहंडी उत्सवाची झलक दर्शविणारा व्हिडिओ सोबत देत आहोत. रत्नागिरीतील आनंदीबाई अभ्यंकर बालकमंदिरातील दहीहंडीची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rupesh Kamble About 351 Days ago
लहानपणाचे दिवस खूप छान असतात.
0
0
Archana Kalyankar About 351 Days ago
छान दिसत होती मुलं अस वाटत असेल की दहीहांडी ही रोज असली तर किती छान वाटेल
0
0
Aditi sawant About 352 Days ago
छानच
0
0
Chetan vichare About 352 Days ago
मला पण लहाण व्हावस वाट्टय 😍
0
0
राजेश गोसावी About 352 Days ago
सुंदर ..... छान दिसत आहेत बाळं
1
0

Select Language
Share Link
 
Search