Next
‘मोदी सरकारचे काम अंत्योदयाच्या विचारानुसार’
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, February 12, 2019 | 03:41 PM
15 0 0
Share this story



मुंबई : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता हे परिवर्तनाचे साधन मानून रांगेतील शेवटच्या माणसाच्या आनंदासाठी काम करत आहेत. त्यांच्या सरकारचे काम पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या अंत्योदयाच्या विचारानुसार चालू आहे,’ असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ११ फेब्रुवारी २०१९ रोजी येथे केले.

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रदेश कार्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या ‘समर्पण दिवस’ कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार, आमदार राज पुरोहित, प्रदेश सचिव संजय पांडे, सुरेश शाह, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, दीव–दमणचे प्रभारी रघुनाथ कुलकर्णी, प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये, अतुल शाह, मुंबई ‘भाजप’ सरचिटणीस अमरजीत मिश्रा उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी एकात्म मानववाद व अंत्योदयाचा विचार मांडला. त्यांचे विचार देशभरातील ‘भाजप’ कार्यकर्त्यांसाठी ऊर्जास्रोत आहेत. सत्ता हे परिवर्तनाचे साधन आहे, असे मानून पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्योदयाच्या संकल्पनेप्रमाणे रांगेतील शेवटच्या माणसाच्या आनंदासाठी काम करत आहेत. सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन विकास करण्यासाठी ‘भाजप’ वचनबद्ध आहे.’



आमदार शेलार म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने अंत्योदयाचा विचार अंमलात आणला आहे. प्रत्येकाचे बँक खाते उघडण्याची जनधन योजना, प्रत्येकाला घर मिळण्यासाठीची आवास योजना, प्रत्येक गरीब महिलेला गॅस कनेक्शन मिळण्यासाठी उज्ज्वला योजना, प्रत्येक गरिबाला विमाकवच मिळावे यासाठीची योजना अशा अनेक योजना राबवून ‘भाजप’ सरकारने अंत्योदयाचा विचार अंमलात आणला आहे.’

या प्रसंगी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ‘भाजप’ संघटनेतर्फे राज्यात ठिकठिकाणी समर्पण दिवस पाळण्यात आला; तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याचे व विचारांचे स्मरण करण्यात आले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link