Next
‘तिवरे धरण बाधितांना सरकारकडून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करणार’
शरद पवार यांचे तिवरे ग्रामस्थांना आश्वासन; तिवरे धरण दुर्घटनास्थळाला भेट
प्रेस रिलीज
Monday, July 08, 2019 | 04:02 PM
15 0 0
Share this article:


चिपळूण : आमदार भास्करराव जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार बाधित कुटुंबांना राज्य व केंद्र शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज (आठ जुलै) तिवरे धरण दुर्घटनेच्या बाधित कुटुंबांना दिली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस वेल्फेअर फंडातून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी एक लाखाचा धनादेश देण्यात आला.

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाच्या दुर्घटनास्थळाला आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भेट देत मृतांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले, शिवाय तिथल्या ग्रामस्थांशी चर्चा करत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावापासून दूर पुनर्वसन करण्याची मागणी ग्रामस्थांनी पवार यांच्याकडे केली. 


तिवरे धरण फुटल्याने २३ जण बेपत्ता झाले होते. त्यापैकी १९ जणांचे मृतदेह आढळून आले आहेत तर अजूनही काही जणांचे मृतदेह सापडलेले नाहीत. धरण फुटीनंतर धरणाचे ठेकेदार शिवसेना आमदार सदानंद चव्हाण आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सर्वच स्तरातून करण्यात आली होती. 

दरम्यान, या दुर्घटनेनंतर शरद पवार यांनी आज दुपारी १२ वाजता तिवरे धरणाची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली शिवाय तिवरे गावातील ग्रामस्थांशी सविस्तर चर्चाही केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम आदींसह राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search