Next
नवे गायक, संगीतकारांसाठी ‘आर्ट सर्कल, रत्नागिरी’तर्फे स्पर्धा
BOI
Saturday, March 24, 2018 | 11:11 AM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : सुगम संगीत आणि शब्दप्रधान गायकी या महाराष्ट्राच्या अनमोल आणि समृद्ध अशा सांस्कृतिक ठेव्याची समृद्धी आणखी वाढत राहावी, या उद्देशाने ‘आर्ट सर्कल, रत्नागिरी’ या संस्थेने गायक आणि संगीतकारांसाठी एक स्पर्धा जाहीर केली आहे. कै. नलिनी प्रताप कानविंदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही मराठी संगीताची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. नव्या दमाच्या गायकांप्रमाणेच नवे प्रयोगशील आणि सर्जनशील संगीतकारदेखील या स्पर्धेच्या निमित्ताने रसिकांसमोर येतील, असा विश्वास आयोजकांना वाटतो.

गायकांच्या स्पर्धेबद्दल :
इच्छुक स्पर्धकांनी स्वतः च्या आवाजातील दोन वेगवेगळ्या प्रकारातील मराठी गाण्यांचे ध्वनिमुद्रण तीन एप्रिल २०१८पर्यंत ‘आर्ट सर्कल’कडे पाठवून द्यावे. ही गीते फक्त तानपुरा, तबला आणि संवादिनी यांच्या साथीने गायलेली असावीत. आलेल्या स्पर्धकांमधून १० स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले जातील आणि त्यांची घोषणा पाच एप्रिल रोजी केली जाईल. या दहा स्पर्धकांची प्रत्यक्ष सादरीकरण स्पर्धा २२ एप्रिल रोजी रत्नागिरीत होईल. त्यामधून तीन विजेते निवडण्यात येतील. 
पात्रता : १८ ते ३५ वयोगटातील कोणीही व्यक्ती.
पारितोषिके : पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे सात हजार, पाच हजार आणि तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक

संगीतरचना स्पर्धेबद्दल :
इच्छुक स्पर्धकांनी आपली स्वतःची नवीन, सर्वोत्तम मराठी संगीतरचना तीन एप्रिल २०१८पर्यंत ‘आर्ट सर्कल’कडे पाठवावी. या रचना फक्त तानपुरा, तबला आणि संवादिनी या वाद्यांच्या साथीने सादर केलेल्या असाव्यात. या स्पर्धेकरिता कोणताही वाद्यमेळ अपेक्षित नाही. या स्पर्धेकरिता वयाची अट नाही. संगीतकारांसाठी असलेली ही स्पर्धा एकाच फेरीत होईल. १२ एप्रिल २०१८ रोजी तीन विजेते निवडण्यात येतील आणि त्यांना वैयक्तिक संपर्क साधून कळवण्यात येईल. त्यांचे सादरीकरण व बक्षीस वितरण २२ एप्रिल २०१८ रोजी रत्नागिरीतच होईल. अंतिम फेरीसाठी प्रतिभावंत संगीतकार कौशल इनामदार सेलेब्रिटी परीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
पारितोषिके : पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे सात हजार, पाच हजार आणि तीन हजार रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक

कै. नलिनी प्रताप कानविंदे यांच्याविषयी : 
मुंबईतील कै. नलिनी प्रताप कानविंदे भावगीत गायिका आणि संगीतप्रेमी होत्या. अखंड विद्यादानाचे कार्य करून त्यांनी संगीत क्षेत्रातील विद्यार्थी घडवले. त्यांच्या संगीतप्रेमाला सामाजिक जाणिवेचेही भान होते. आपल्या उत्पन्नातील काही भाग संगीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरूपात देण्याचे त्यांनी ठरवले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय या संगीत शिक्षण देणाऱ्या भारतातील अग्रगण्य संस्थेत अजूनही ती बक्षिसे दिली जातात. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘आर्ट सर्कल’तर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

ध्वनिमुद्रण कसे पाठवावे?
स्पर्धकांनी आपल्या माहितीसह आपले ध्वनिमुद्रण व्हॉट्सअॅप किंवा ई-मेलद्वारे पाठवावे.
व्हॉट्सअॅप क्रमांक : ९११९५ २९३९१
ई-मेल आयडी : nalinisangeet@gmail.com
अधिक माहितीसाठी संपर्क : अभिजित भट, स्पर्धेचे समन्वयक – ९४२१६ २१२१७
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link