Next
पौड फाटा येथे मोफत आरोग्य शिबीर
प्रेस रिलीज
Wednesday, February 14 | 03:22 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या कोथरूड मतदारसंघ प्रभाग क्र. १३ तर्फे नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन पौड फाटा येथील पं. दीनदयाळ उपाध्याय शाळा येथे करण्यात आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते आणि भाग कार्यवाह सुधीर जवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. शिबिरामध्ये स्त्रीरोग चिकित्सा (महिलांचे विविध कर्करोग), पोटाचे विविध विकार, हाडांची ठिसूळता, हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, रक्त तपासणी, मॅमोग्राफी, नेत्र तपसणी, मुखरोग व दंत तपसणी, स्थूलता तपासणी यांसारख्या अनेक तपासण्या करण्यात आल्या. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

‘यापुढील काळात कोथरूड मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा,’ असे प्रतिपादन आयोजक आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केले.

या वेळी स्थानिक नगरसेवक जयंत भावे, माधुरी सहस्रबुद्धे, दीपक पोटे, डॉ. विश्वास करमकर, डॉ. संजीव ठाकूर, डॉ. शेखर कुलकर्णी, डॉ. माधव केळकर, डॉ. प्राची वैद्य, डॉ. गणेश चौधरी, डॉ. झपे, डॉ. पठाण, डॉ. सौ. रानडे यांच्यासह पदाधिकारी प्रकाश बालवडकर, प्रशांत हरसुले, अमोल डांगे, मंदार घाटे, उदय कड, गणेश कळमकर, कुलदीप सावळेकर, राज तांबोळी, गौरी करंजकर, राजेंद्र येडे, बाळासाहेब धनवे, प्रदीप जोशी, विठ्ठल मानकर, चंद्रकांत पवार, सुयश गोडबोले, पुनीत जोशी, मयूर देशपांडे, विकास सिधये, शिवाजी शेळके, अनुराधा येडके, जनार्दन क्षीरसागर, चंद्रकांत पाटकर, राजेश पाटील, चंद्रप्रभा खिलारे, संगीता अधवाडे, स्वाती हिर्लेकर, वैभव जमदाडे, ऋत्विज अघोर, सुनील अभंगे, सुभाष झानपुरे, विवेक विप्रदास, सौरभ अथणीकर, रेखा असोदेकर, निशा सिधये, प्राची बगाटे, हिरा सुपेकर, सुरेखा पठारे, श्री. कामत, बाळकृष्ण कारखानीस, माधव ठाकूर, भास्कर गोहाड, कमलाकर चव्हाण, रमेश चव्हाण, तुषार दिघे, जगदीश डिंगरे, माणिक दीक्षित, हर्षदा फरांदे, प्रमिला फाले, कीर्ती गावडे, रामदास गावडे, नीलेश घोडके, पंकज गोरखे, सुनील होलबोले, शंतनू खिलारे, मंगल शिंदे, अपर्णा लोणारे, अर्जुन मल्हारे, नीलेश खळदकर, मंगेश सुप्रेकर, समीर ताडे, अजिंक्य चाफेकर, बागेश्री ठिपसे, किरण देखणे, अविनाश वायदंडे, सुलभ जगताप, रूपाली वाघ आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link