Next
‘क्रेडाई’कडून केरळला एक कोटी ३५ लाखांची मदत
प्रेस रिलीज
Saturday, September 15 | 12:06 PM
15 0 0
Share this story

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा धनादेश सुपूर्द करताना क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया. सोबत इतर सदस्य.

पुणे : केरळ पूरग्रस्तांसाठी क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्व शहरांतील विकसकांनी एकत्र येऊन सढळपणे मदतीचा हात पुढे केला असून, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक कोटी ३५ लाख ४३ हजार ५०० रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

नुकत्याच आलेल्या महापुराने केरळचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी जगभरातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. अशावेळी केरळमध्ये आलेल्या पूरपरिस्थिचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पूरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत करण्याचे आव्हान केले होते. या पार्श्वभूमीवर क्रेडाई महाराष्ट्राच्या सर्व शहरांतील विकसकांनी एकत्र येऊन सढळ हाताने मदत केली आहे. या सर्व जमा झालेल्या निधीचा धनादेश क्रेडाई महाराष्ट्रच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.

या प्रसंगी क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया, उपाध्यक्ष रसिक चौहान, राज्य सल्लागार परिषदेचे अध्यक्ष सुहास मर्चंट, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे व मनीष कनेरिया उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link