Next
इंडिया-इंडोनेशिया ब्युटी,​ फॅशन स्पर्धेचे आयोजन
स्पर्धेच्या निवड चाचणीला आठ जूनपासून सुरुवात
प्रेस रिलीज
Friday, June 07, 2019 | 03:38 PM
15 0 0
Share this article:

पुणे : नील ग्रुप ऑफ कंपनीज, रेवा हाउस ऑफ स्पोर्ट्स आणि पुणे फिल्म कास्टिंग यांच्या केटीएम-थ्री इंडिया-इंडोनेशिया ब्युटी, फॅशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेची निवड चाचणी आठ जूनपासून सुरू होणार आहे. नवोदित बालकलाकार, युवक-युवती आणि गृहिणींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ही स्पर्धा घेतली जाते. 

या स्पर्धेची निवड चाचणी पुणे, मुंबई, दिल्ली, अहमदनगर, नाशिक, गुवाहाटी, अहमदाबाद, इंदोर या शहरांमध्ये आठ जूनपासून सुरू होणार आहे. या फेरीतून निवडल्या गेलेल्या स्पर्धकांची महाअंतिम फेरी बाली-इंडोनेशिया येथील कुटा बीचवर जुलै महिन्यात होणार आहे.

स्पर्धेचे परीक्षण सिने अभिनेते राहुल रॉय आणि भारतीय कुस्तीगीर खेळाडू मनीष मान हे करणार आहेत. या स्पर्धेचे ग्रुमिंग आणि ट्रेनिंग सेशन नील कांबळे आणि फॅशन कोरिओग्राफर आणि डिझायनर विशाल कपूर करणार आहेत. या वेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले आणि मिसेस इंडिया रूपाली सावंत यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या स्पर्धेचे आयोजन नील ग्रुप ऑफ कंपनीजचे मॅनेजिंग डायरेक्टर नील कांबळे, रेवा हाउस ऑफ स्पोर्ट्सचे मॅनेजिंग डायरेक्टर शिवाजी साळुंके, पुणे फिल्म कास्टिंगचे मॅनेजिंग डायरेक्टर सचिन वाडकर यांनी केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Manish mann About 75 Days ago
💐🔥👍
0
0
Hrishi About 75 Days ago
Hii hrishi is here I whant to work with you I what do modelling and acting also I dont know where we have to feel up tha form can u ask me about that
1
0
Aamir pathan About 75 Days ago
Congratulations sir ji great event All the best
1
0
Mayra About 76 Days ago
I'm transgender and I I'm interested
1
0

Select Language
Share Link
 
Search