Next
‘हुजपा’ महाविद्यालयात मतदार जनजागरण रॅली
BOI
Friday, January 25, 2019 | 05:27 PM
15 0 0
Share this story



हिमायतनगर :
येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी  सकाळी मतदार जनजागरण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन नगराध्यक्ष कुणाल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला.

या वेळी नायब तहसीलदार सय्यद, नगरसेवक विनायक मेंडके, कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. डी. के. कदम, राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. लक्ष्मण डोंगरे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व सांगितले. नंतर ही रॅली हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्याने निघाली. यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता.

या रॅलीच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील प्रा. गुंडाळे, डॉ. भदरगे, डॉ. पवार, डॉ. जलील, डॉ. देशमुख, प्रा. वाखरडकर, प्रा. दिवडे, प्रा. कदम, प्रा. यादव, प्रा. राहुलवाड, प्रा. सूर्यवंशी, प्रा.दगडे, प्रा. बोनडारे, विद्यार्थी संसद सचिव अजय बेदरकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. रॅलीची सांगता राष्ट्रगीताने झाली.

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link